आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:49 PM2024-02-29T12:49:16+5:302024-02-29T12:50:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर भर सभेत टीका केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे भाजपासोबत गेले होते. या भ्रष्टाचारावरून भाजपा सातत्याने राष्ट्रवादीला टार्गेट करायची.

Now that we are free from corruption, we are only attacked by BJP; Supriya Sule Target Ajit pawar, Amit shah | आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला? 

आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर भर सभेत टीका केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे भाजपासोबत गेले होते. या भ्रष्टाचारावरून भाजपा सातत्याने राष्ट्रवादीला टार्गेट करायची. आता त्यावर शब्दही काढत नाहीय. मी बारामतीकर अशा निनावी पत्रावरून प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्ही आता भ्रष्टाचारमुक्त झालेले आहोत, असा टोला लगावला. 

निनावी पत्रावर सुळे यांनी याबाबत मला माहिती नाही असे उत्तर दिले. पवार फॅमिली हे एकत्र कुटुंब आहे आणि यात जे जे निर्णय होतात, ते सर्वानुमते घेतले जातात. माझ्या लग्नाचे कन्यादान प्रतापराव पवार यांनी केले आहे. माझ्या लग्नाच्या कार्डवर आप्पासाहेब पवार यांचे नाव होते. माझा राजकारणातील प्रवेश ठरला, त्यावेळी सुध्दा आमच्या कुटुंबाने एकत्रित निर्णय घेतला आहे. आमच्याकडे कोणाला काय शिक्षण घ्यायचेय याबाबतही चर्चा करून निर्णय होतात. काहीवेळा एखादे पाऊल मागे घ्यावे लागते, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

अमित शहांनी घराणेशाहीवर टीका केली यावर सुळे यांनी आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालेले आहोत. आमच्यावर प्रहार  फक्त भ्रष्टाचारावर व्हायचा. मात्र आता आमच्यावर कोणतेही आरोप होत नाही. मात्र घराणेशाहीचा आरोप होतो आहे. तो आरोप मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा भाजप सोबत होते, तेव्हा त्यांना चालत होते. मग आता असे का? असा सवाल उपस्थित केला. 

अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. हा आरोप संसदेत ऑन रेकॉर्ड केला होता. मी माझ्या कानांनी ऐकला डोळ्यांनी पाहिला आहे. यामुळे भ्रष्टाचारी कोण आहे हे देशातील जनतेला माहित आहे.  माझी लढाई या दिल्लीच्या तक्ताविरोधात आहे की जो महाराष्ट्राचा विरोध करतो. देशाचे पंतप्रधान शरद पवारांवर टीका करत असतील तर ही लोकशाही आहे. यात गैर काय? याच भाजपने शरद पवारांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. मी भाजप सरकारचे आभार मानते, असे सुळे म्हणाल्या. 

Web Title: Now that we are free from corruption, we are only attacked by BJP; Supriya Sule Target Ajit pawar, Amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.