शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आता पुण्यातही ‘बाईक आॅन रेन्ट’

By admin | Updated: January 29, 2015 02:29 IST

गोवा, बंगळुरूमधील ‘बाईक आॅन रेन्ट’चा फंडा आता पुण्यातही आला आहे. लवकरच पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही फिरण्यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी मिळणार आहे

पुणे : गोवा, बंगळुरूमधील ‘बाईक आॅन रेन्ट’चा फंडा आता पुण्यातही आला आहे. लवकरच पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही फिरण्यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी मिळणार आहे. परिवहन विभागाने एका खासगी कंपनीला १० दुचाकी गाड्यांसाठी याबाबत परवानगी दिली असून, पुढील महिन्यात या गाड्या रस्त्यांवरून धावतील. राज्यात पहिल्यांदाच ‘बाईक आॅन रेन्ट’ ही संकल्पना अस्तित्वात येणार आहे.पर्यटनासाठी जगभरातून गोव्यात पर्यटक येत असतात. त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे गोवा फिरता यावा यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी पुरविल्या जातात. गोव्यात ही संकल्पना खूप लोकप्रिय झालेली आहे. त्याचप्रमाणे बंगळुरूमध्येही या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॅब, टॅक्सी किंवा रिक्षा यांसारख्या वाहनांमधून प्रवास करताना जास्त खर्च येत असल्याने अनेक जण भाडेतत्त्वावरील दुचाकींचा वापर करतात. आता ही संकल्पना राज्यात पहिल्यांदाच पुण्यात आली आहे. आयटी हब म्हणून लोकप्रिय असलेले पुणे पर्यटकांसाठीही महत्त्वाचे शहर बनत आहे. तसेच पुण्यात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. या सर्वांनाच शहरात फिरण्यासाठी रिक्षा, कॅब किंवा पीएमपीचा वापर करावा लागतो. मात्र, अनेकांना रिक्षा, कॅबचे भाडे परवडत नाही. त्यांच्यासाठी भाडेतत्त्वावरील बाईक फायदेशीर ठरू शकते. याविषयी अधिक माहिती देताना स्नॅप बाईक्स या कंपनीचे व्यवसाय विकास व्यवस्थापक आशिष इंगळे म्हणाले, की परिवहन आयुक्तालयाने त्यासाठी कंपनीला १० दुचाकींचा परवाना दिला आहे. आरटीओकडे दुचाकींची नोंदणी झाली असून, लवकरच या गाड्या भाडेतत्त्वावर दिल्या जातील. प्रत्येक गाडीला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. भाडे अद्याप निश्चित नाही. हे भाडे एका दिवसासाठी निश्चित केले जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच असा परवाना देण्यात आला आहे.