शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

आता कैदीही चालविणार सलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 09:30 IST

Yerwada Jail : येरवडा कारागृहात कैद्यांमार्फत सलून चालविण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना सुधारण्याची संधी मिळणार आहे.

राहुल गायकवाड पुणे : रागाच्या भरात हातून एखादा गुन्हा घडताे आणि त्यानंतर अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागतात. शिक्षा भाेगून आल्यानंतरही समाज अशा कैद्यांना अनेकदा स्विकारत नाही. कैदी जरी असला तरी त्याला सुधारण्याची संधी मिळावी यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आता जेल प्रशासनाकडून चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांद्वारे सलून चालविण्यात येणार आहे. या माध्यमातून शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांना सुधारण्याची एक संधी देण्यात येणार आहे. 

कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांचे कारागृह प्रशासनाकडून पुर्नवसन करण्यात येते. येरवडा कारागृहात कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबराेबर त्यांच्याकडून विविध कामे करुन घेतली जातात. कैदी कारागृहात कामात गुंतलेले राहून रहावेत तसेच त्यांना सुधारण्याची संधी मिळावी हा यामागील हेतू असताे. दरवर्षी कराेडाे रुपयांची उलाढाल ही कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंपासून हाेत असते. कारागृहाचे येरवडा भागात एक शाेरुम सुद्धा असून तेथे कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीस ठेवण्यात येतात. यात बेकरी पदार्थांपासून ते गृहउपयाेगी वस्तूंचा समावेश आहे. 

कारागृहाच्या माध्यामातून आता कैद्यांद्वारे सलून चालविण्यात येणार आहे. यामध्ये पाच ते सहा कैद्यांना काम देण्यात येणार आहे. खुल्या कारागृहातील चांगल्या वर्तनुकीचे हे कैदी असणार आहेत. त्याचबराेबर इस्त्रीचे नवीन शाॅप सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून कैद्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या अगाेदर देखील कारागृहाच्या माध्यामातून कैद्यांद्वारे वाॅशिंग सेंंटर तसेच इस्त्री शाॅप चालविण्यात येत आहे. बाजारभावपेक्षा कमी पैशात सलून आणि इस्त्री शाॅप चालविण्यात येणार आहे. या शाॅप्सचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी चार वाजता हाेणार आहे. 

याविषयी बाेलताना येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार म्हणाले, कैद्यांच्या पुनर्वसनासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. या माध्यमातून कैदी शिक्षा भाेगून बाहेर पडल्यानंतर त्यांना व्यवसाय सुरु करता येऊ शकेल. या आधी कैद्यांमार्फत वाॅशिंग सेंटर तसेच इस्त्री शाॅप चालविण्यात येत आहे. आता कैद्यांमार्फत सलून देखील चालविण्यात येणार असून याद्वारे पाच ते सहा कैद्यांच्या हाताला काम मिळणार आहे. त्याचबराेबर नागरिकानांदेखील कमी पैशामध्ये या सुविधा मिळणार आहेत. सलूनचे सर्व प्रशिक्षण कैद्यांना देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कैद्यांना इतर लाेकांसाेबत मिसळता येणार असून सुधारण्याची एक संधी मिळणार आहे. 

टॅग्स :yerwada jailयेरवडा जेलPrisonतुरुंगPuneपुणे