शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

आता गावागावांतही मिळणार ‘आधार’

By admin | Updated: August 27, 2015 04:46 IST

आधार कार्ड नोंदणीसाठी खेडेगावातील ग्रामस्थांचे हेलपाटे टाळण्यासाठी तसेच या मोहिमेला गती देण्यासाठी शासनाने संग्राम कक्षातील आॅपरेटरची मदत घेण्याचे ठरविले असून

पुणे : आधार कार्ड नोंदणीसाठी खेडेगावातील ग्रामस्थांचे हेलपाटे टाळण्यासाठी तसेच या मोहिमेला गती देण्यासाठी शासनाने संग्राम कक्षातील आॅपरेटरची मदत घेण्याचे ठरविले असून, आता त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीतच आधार कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.यासाठीचे दोन दिवसांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेत झाले असून, लवकरच हे संग्राम आॅपरेटर आधार आॅपरेटर म्हणूनही काम पाहणार आहेत.ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्यांतील विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी राज्यातील ग्रामपंचायतीतील संग्राम आॅपरेटरची मदत घेण्याच्या प्रस्तावाला सहमती मिळाली असून, त्यानुसार राज्यात नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, नागपूर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत संग्राम कक्षातील आॅपरेटरना प्रशिक्षण दिले जात असून, प्रशिक्षणानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत जे पास होतात, त्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांची या कामासाठी निवड करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ३५० संग्राम आॅपरेटरना २५ व २६ आॅगस्ट असे दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची २७ आॅगस्टला परीक्षा घेण्यात येईल. हे प्रशिक्षित आॅपरेटर त्या-त्या ग्रामपंचायतीत सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठवडेबाजार, मोठ्या यात्रा, मोठे दवाखाने, प्रसूतिगृह (खासगी किंवा सरकारी) आदी ठिकाणी गरजेनुसार कॅम्प लावून आधार नोंदणी करणार आहेत. त्यांनी या नोंदणीसाठी ग्रामस्थ किंवा विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारायचे नाही, अशा स्पष्ट सूचना असून, तसे केल्यास संगणक परिचालक किंवा ग्रामपंचायतींवर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)आधारला मिळणार गतीजिल्ह्यात ९४ लाख २९ हजार ४०८ लोकसंख्या असून, ४७ लाख ५८ हजार २३५ नागरिकांनी आधार नोंदणी केली आहे. अजून ४६ लाख ७१ हजार १७३ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केलेली नाही. जिल्ह्यातील प्रशिक्षण दिलेल्या ३५० आॅपरेटरपैैकी साधारण २०० आॅपरेटर ही परीक्षा पास होतील, असा अंदाज आहे. आता जिल्ह्यात १७० मशीन उपलब्ध आहेत. आणखी मशीन शासनातर्फे मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता आधार नोंदणीला गती येईल. ग्रामस्थांना पूर्वकल्पनाज्या गावात किंवा सार्वजनिक ठिकाणी हा आधारचा कॅम्प होणार आहे, तेथे गावात दवंडी किंवा इतर माध्यमातून पूर्वकल्पना देण्यात येईल. तसेच, ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही, त्यांना फॉर्म देऊन अगोदरच तो भरून घेतला जाणार आहे. हा कॅम्प सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्र्यंत ठेवून त्या गावातील सर्व नागरिकांना आधार कार्ड देण्याचा मानस आहे.