साडेतीन हजार बेकायदा बांधकामांना नोटीस

By Admin | Updated: July 3, 2015 23:55 IST2015-07-03T23:55:18+5:302015-07-03T23:55:18+5:30

अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई महापालिकेच्या वतीने सुरू असून, २०१२ नंतरच्या ३ हजार ६०२ अनधिकृत बांधकामांना नोटीस दिली आहे.

Notice to three and a half thousand illegal constructions | साडेतीन हजार बेकायदा बांधकामांना नोटीस

साडेतीन हजार बेकायदा बांधकामांना नोटीस

पिंपरी : अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई महापालिकेच्या वतीने सुरू असून, २०१२ नंतरच्या ३ हजार ६०२ अनधिकृत बांधकामांना नोटीस दिली आहे. शहरातील १०६४ अधिकृत बांधकामे भुईसपाट केल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केली आहे.
शहरातील ६६ हजार अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत विशेष मोहीम राबविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला होता. त्यानुसार एप्रिल व जून या दोन महिन्यांत महापालिकेतर्फे मोहीम राबविली.
पहिल्या कारवाईनंतर न्यायालयाने त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने व्यावसायिक बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने १ ते १५ जून या कालावधीत कारवाई मोहीम राबविली. त्यामध्ये शहरातील ७२ हजार ५२१ चौरस फुटांवरील ११६ अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. कारवाईनंतर अनधिकृत बांधाकामांचा लेखाजोखा मंगळवारी महापालिकेच्या वतीने न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केला आहे.
महापालिकेने २०१२ नंतर झालेल्या ३ हजार ६०२ अनधिकृत बांधकामांना नोटीस दिल्याचे नमूद केले आहे.
यासाठी पदनिर्मितीच्या विषयाची माहिती न्यायालयास दिली आहे. २०१२ पूर्वीच्या १२६४ अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Notice to three and a half thousand illegal constructions