शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

डीपी समितीच्या सदस्यांना नोटीस

By admin | Updated: September 24, 2014 06:09 IST

शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील नागरिकांच्या हरकती-सूचनांवर सुनावणी सुरू आहे.

पुणे : शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील नागरिकांच्या हरकती-सूचनांवर सुनावणी सुरू आहे. त्याकाळात नियोजन समितीचे सदस्य सारंग यादवाडकर व सचिन पुणेकर यांनी काही नकाशे पालिकेच्या सोर्स संगणकावरून परस्पर कॉपी केले. त्यामुळे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे. त्यावर खुलासा केल्यानंतरही महापालिकेकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट सर्व नकाशे जनतेसाठी खुले केले पाहिजेत, असे समिती सदस्यांचे म्हणणे आहे. शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील नागरिकांच्या हरकती व सूचनांच्या सुनावनीसाठी शासनाने चार सदस्यांची नियुक्ती केली. त्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ म्हणून शासनाने यादवाडकर व पुणेकर यांची नियुक्ती केली होती. संंबंधित सदस्यांना महापालिकेने सर्व माहिती व कागदपत्रे दिली होती. त्यानंतरही दोन सदस्यांनी महापालिकेची बौद्धिक संपत्ती असलेल्या सॉफ्टवेअरचे नकाशे परस्पर कॉपी करून घेतले. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा २०००चे कलम ४३ व ६६ अन्वये बेकायदा असून, त्यानुसार आपल्यावर कारवाई का करू नये, अशी नोटीस प्रशांत वाघमारे यांनी बजावली आहे. त्यावर यादवाडकर म्हणाले, ‘‘समिती सदस्य असल्याने सुनावणीसाठी सर्व नकाशांची मागणी केली. परंतु, सूक्ष्म नकाशे उपलब्ध करून दिले नाहीत. पालिकेच्या वेबसाइटवरील नकाशे अस्पष्ट आहेत. त्यामुळे पालिकेच्या संगणकावरून संबंधित नकाशे कॉपी करून सुनावणीच्या माहितीसाठी घेतले आहेत. ते जनतेलाही खुले करणे अपेक्षित आहे. असे असताना आम्हाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा खुलासा केला आहे. परंतु, त्यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही. ’’ (प्रतिनिधी)