मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 20:32 IST2025-08-04T20:31:53+5:302025-08-04T20:32:14+5:30
Pune Police News : पुणे पोलिसांनी मुलींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
Pune Police News : पुण्यात काल पोलिसांनी मुलींना मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे. मारहाण, शिवीगाळ, जातीवाचक शब्द वापरले या कोणत्याच आरोपामध्ये तथ्य नसल्याचे पुणेपोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी पुण्यातील कोथरुड पोलिसांनी मारहाण आणि जातीवाचक शब्द वापरले असल्याचा आरोप तीन मुलींनी केला होता. पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आरोप फेटाळून लावले. या संपूर्ण प्रकरणात काहीही तथ्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं स्पष्ट केले.
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
"छत्रपती संभाजी नगरची एका मिसिंग महिलेची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करण्यासाठी पोलीस पुण्यात आले होते आणि त्यांना आम्ही दोन दामिनी मार्शल दिले. कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र देऊन महिला कर्मचारी गरज असल्याचं सांगितलं होतं, तसा लेखी अर्ज दिला होता. महिला सहाय्यता कक्ष आणि हिरकणी कक्ष या ठिकाणी या महिलेची चौकशी केली. यात मिसिंग मुलगी होती ती ट्रेस झाली. यानंतर पोलिसांचे त्या ठिकाणी पथक पोहोचले. ते पथक संबंधित मुलीला घेऊन निघून गेले, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
"पहाटे पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याची तक्रार संबंधित मुलींनी केली होती. यात प्रथमदर्शनी कोणत्याही तथ्य आढळून आलं नाही. अनेक कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात आले तिथेही त्यांना यात तथ्य नसल्याचे सांगितलं. या संदर्भात सगळ्यांना लेखी पत्र देऊन देखील कळवण्यात आले, असंही पोलीस उपायुक्त कदम म्हणाले.
आमची मागणी एफआयआर दाखल करा अशी होती; श्वेता पाटील
"एक तारखेपासून आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी मागे लागलो आहे. दिवसभर आम्हाला भेटायला सगळे अधिकारी आले, पण सगळ्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. पोलिसांनी नीट ऐकूनही घेतलं नाही. पोलिसांनी हे प्रकरण सिरीअस घेतले नाही, आमची मागणी फक्त आमचा अधिकार फक्त एफआयआर दाखल करुन घ्या एवढीच होती. आमच्यासोबत अनेक संघटनांचे लोक होते.त्यांनी शेवटपर्यंत एफआयआर दाखल करुन घेतला नाही, ज्या मुलींवर अत्याचार झाला होता त्या मुलींना एक तारखेला उचलले होते. तेव्हापासून त्या झोपलेल्या नाहीत. त्यांचं मेडिकल आम्ही खासगी रुग्णालयात केले. आम्ही त्यांना एफआयआर दाखल करत नाही असं एक पत्र द्या. दोन तासानंतर त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं. त्यामध्ये त्यांनी एफआयआर दाखल करणार नाही म्हणून सांगितलं. आमची मागणी फक्त एफआयआर दाखल करा एवढीच आहे, अशी माहिती श्वेता पाटील यांनी दिली.