शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भावना गवळी, अजित पवार मराठी नाहीत का? 'तरीही कारवाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 19:05 IST

भावना गवळी या देखील मराठाच आहेत, पाच वेळा निवडून आलेल्या तरुण खासदार आहेत. ती मराठी नाही का ? तिचा छळ सुरू असताना कोणी आवाज उठवत नाही....

पुणे: महाराष्ट्रात सगळेच मराठी आहेत, क्रांती रेडकर (kranti redkar) मराठी आहेत, तिचे पती एनसीबीमध्ये अधिकारी आहेत. सध्या महाराष्ट्रात दिसत असलेलं चित्र व्यक्तिगत नाही. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने काहीतरी चूक केली असा लोकांचा समज आहे. ही लढाई त्यांच्याविरुद्ध सुरू आहे. क्रांती रेडकर सोबतची वैयक्तिक लढाई नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) पुण्यात म्हणाले. सध्या केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात येऊन आमच्या लोकांचा छळ करतेय. महाराष्ट्राला बदनाम करत आहे. आमच्या मंत्र्यांच्या इतर लोकांच्या घरावर धाडी टाकत आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

भावना गवळी या देखील मराठाच आहेत, पाच वेळा निवडून आलेल्या तरुण खासदार आहेत. ती मराठी नाही का ? तिचा छळ सुरू असताना कोणी आवाज उठवत नाही. अजित पवारांचे नातेवाईक, त्यांच्या बहिणी मराठी नाहीत का? देगलूरची निवडणूक सुरू असताना तुम्हाला अशोक चव्हाणांच्या लोकांवर धाडी टाकण्याची बुद्धी सुचते? ते मराठी नाहीत का? अनिल परब मराठी नाहीत? राज्यात सगळेच मराठी आहेत. त्यांचं रक्षण करणं, त्यांची प्रतिष्ठा सांभाळणं या सरकारचं काम आहे आणि आम्ही ते करतोय.

भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. हा त्या पक्षाचा दावा आहे, त्यामुळे जगातला सर्वात मोठा पक्ष सत्तेतून पायउतार झाला तरी त्या पक्षाचं अस्तित्व तर राहणारच. तो प्रमुख विरोधी पक्ष असेल. महाराष्ट्रातील या पक्षाची ताकद आहे. 105 आमदार असतानाही सत्ता नाही पण ताकद आहे. ते दाखवत नाहीत हा भाग वेगळा, त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ताकद राहील. देशाचा राजकारणातून पुढील काही दशकं राहणारच, असंही राऊत म्हणाले

पुढे बोलताना राऊत म्हणाले नवाब मलिक यांनी जे पुरावे समोर आणले ते जर खरे असतील तर हे प्रकरण फार गंभीर आहे. या प्रकरणात आणखी एक इंटरव्हल व्हायचा आहे. नवाब मलिक ते लवकरच करतील.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारBhavna Gavliभावना गवळीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयKranti Redkarक्रांती रेडकर