शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्टॅम्पपेपर मिळत नसल्याने वकील आणि पक्षकारांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 19:25 IST

वकील व पक्षकार यांच्याकडून मुद्रांकाची लवकरात लवकर विक्री सुरु करावी अशी मागणी

ठळक मुद्देअडीच महिन्यांहून अधिक काळ जिल्हा न्यायालयात केवळ अतिमहत्वाच्या प्रकरणांची सुनावणी

पुणे : कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन न्यायालये बंद ठेवण्यात आली होती. 8 जुननंतर ती दोन शिफ्ट मध्ये सुरु करण्यात आली आहे. यासगळयात प्रतिज्ञापत्र, अ‍ॅफेडिव्हीट, यासारख्या वेगवेगळया कारणांसाठी स्टॅम्पपेरची गरज पक्षकार आणि वकिलांना भासत आहे. मात्र त्याची विक्री होत नसल्याने त्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. मुद्रांकाची विक्री लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी वकील व पक्षकार यांच्याकडून होत आहे. कटेंमेंट भाग वगळता अनेक ठिकाणी मुद्रांक विक्री सुरु केली जाणार आहे.  अद्याप खासगी विक्रेत्यांकडून देखील स्टॅम्प पेपरची विक्री होत नसल्याचे दिसून आले आहे.  गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ जिल्हा न्यायालयात केवळ अतिमहत्वाच्या प्रकरणांची सुनावणी होत आहे. याशिवाय जामीनाची प्रकरणे हाताळली जात आहेत. मात्र याप्रकारच्या सर्व व्यवहारांसाठी आवश्यक असणा-या स्टॅम्प पेपरची विक्री होत नसल्याने वकीलांबरोबरच पक्षकारांची चिंता वाढली आहे. यावर तातडीने मार्ग निघावा अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. जिल्हा न्यायालयात दररोज हजारोच्या संख्येने पक्षकारांची ये जा सुरु असते. यावेळी मोठ्या संख्येने स्टँम्पपेपरची विक्री होते. सध्या जिल्हा न्यायालय देखील कटेंनमेंट भागात येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणस्तव न्यायालय बंद ठेवण्यात आले आहे. तसेच कटेन्मेंट भागातील स्टॅम्पपेपरची विक्री करणारी दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहे. कोर्टाच्या आतील सोसायटी ही जिल्हा न्यायालयाच्या अधिकार कक्षेत येते. अशावेळी न्यायालयाच्या आदेशाशिवाय कुठलेही कार्यवाही करता येत नाही. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षकार, वकील यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव  स्टँम्पपेपरची विक्री बंद करण्यात आली आहे. रोज साधारण अडीच ते तीन हजार स्टँम्पपेपरची विक्री होते. वेगवेगळया कामांसाठी स्टँम्पपेपरचा उपयोग केला जातो. स्टँम्पपेपरला पर्याय म्हणून बँकांमध्ये फ्रँकिंगचा पर्याय अनेकांनी स्वीकारला आहे. बहुतांशी नागरिक हे मुद्रांकावर व्यवहार करतात. बँका, दुय्यम निबंधक कार्यालये, न्यायालय आणि अन्य सरकारी कार्यालयांमधील कामांसाठी नागरिकांकडून मुद्रांक खरेदी केली जाते. 

आता सध्या शहरात मुद्रांक विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात केवळ कंटेंनमेंट भागात विक्रीस परवानगी नाही. दस्त नोंदणी कार्यालये चालू झाली आहे परंतु मुद्रांक विक्रेते यांना मुद्रांक विकण्याची परवानगी नसल्याने वकीलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, कामकाज होत नसल्या कारणाने ज्युनिअर वकिलांचे उत्पन्न बंद आहे. अनेक प्रकारची घोषणा पत्रे, प्रतिज्ञा पत्रे, गहाणखते कोर्ट,  फी तिकिटे, साठेखत या करिता किरकोळ मुद्रांकाची आवश्यकता असते. मात्र सध्या मुद्रांक विक्री बंद असल्या मुळे कामकाज करताना वकिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉक डाउन चा पाचवा टप्पा चालू झाला यात अनेक व्यवसायांना चालू करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. मुद्रांक आणि कोर्ट फी तिकिटे उपलब्ध नसल्या कारणाने असंख्य कामकाज खोळंबले आहेत, यामुळे शासनाचा रोजचा 1 लाख रुपये किमतीचा महसुली तोटा होत आहे. -  अ?ॅड. अमोल काजळे पाटील (माजी सचिव, पुणे  जिल्हा वकील संघटना) 

 

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस