शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे ती म्हणजे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे ती म्हणजे राजकारण... ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या किडीपासून बचाव करता आला तर बघा, ’’ अशी पोस्ट अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने केली असून, ती पोस्ट भलतीच व्हायरल झाली आहे. परिस्थिती किती बिकट आहे हे सांगताना ‘ अवघड आहे सगळंच....काळजी घ्या’ असा टोला देखील तिने लगावला आहे. मात्र, ही बोचरी टीका राष्ट्रवादीच्या चित्रपट,कला आणि सांस्कृतिक विभागाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, ‘सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये ’ असं प्रत्युत्तर विभागाच्या प्रदेशाध्यक्षांनी या अभिनेत्रीला दिलं आहे.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी तिला पाठिंबा दिला असून, काही जणांनी तिला ट्रोल देखील केले आहे. परंतु, तिची पोस्ट ही कोणा एका पक्षाला उद्देशून नसतानाही, राष्ट्रवादीच्या चित्रपट,कला आणि सांस्कृतिक विभागाला ही पोस्ट काहीशी झोंबली आहे. तेजस्विनीच्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी’ सर्वच राजकारण्यांना एका पारड्यात ठेवून चांगले काम करणा-या राजकारण्यांना विनाकारण आरोपीच्या पिंज-यात उभं करण ही बाबच मुळात चुकीची असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री हे रात्रंदिवस एक करून या महामारीत लोकांना वाचवण्यासाठी एकत्र येऊन काम करताना आपण पाहात आहोत.

राजकारणावर टीका करण्यापेक्षा एक कलावंत म्हणून आपण लोकांसाठी काय करू शकतो, याचा विचार करून काहीच नाही तर एक व्हिडिओ करून तरी लोकांनी घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करू शकतो. राजकीय व्यवस्थेवर बोलण्यापेक्षा लोकांना आपण किती मदत करतो, यावर भर दिला तर त्याचे सर्वत्र कौतुक होईल, असा टोला देखील त्यांनी तेजस्विनीला लगावला आहे..

-----------------------------------