शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:59 IST

पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे, गुन्हेगाराला क्षमा नाही

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर हे गुन्हेगारीवरून टीका करत आहेत. त्यावरून धंगेकर यांची त्यांच्या नेत्याकडे तक्रार केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते. त्याबद्दल विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धंगेकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांना मी महायुतीत दंगा नको असे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ब्राम्हण जागृती सेवा संघ यांच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार या सोहळ्यानंतर ते बोलत होते. 

शिंदे म्हणाले,  पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे. गुन्हेगाराला क्षमा नाही. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. पुणे हे गुन्हेगारीमुक्त झाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. पोलीस सक्षमपणे काम करत आहेत. 

....तिथे हा एकनाथ शिंदे पोचला

जिथे गरज आहे, संकट आहे, तिथे हा एकनाथ शिंदे पोचला, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्य शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास सोपा नव्हता. पण कार्य करत आलो. शेतकऱ्यांना मदतीसाठी दिवाळीपूर्वी ३२ हजार कोटी पॅकेज जाहीर केले आहे. सामान्यांचे सरकार म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली आहे, त्यामुळे ती बंद होणार नाही. एका मुलीने उच्च शिक्षण घेत असताना खर्चासाठी आत्महत्या केली, मी उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला, त्यावर पूर्ण शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. सत्ता येते आणि जाते, पण एकदा गेलेले नाव परत येत नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

ब्राम्हण समाज जातीय सलोखा वाढविण्यात पुढे 

सध्या जातीच्या भिंती उभ्या राहत आहेत. पण, ब्राम्हण समाज जातीय सलोखा वाढविण्यात पुढे आहे. जातीच्या भिंती तोडून ज्याच्याकडे उत्तम आहे ते समाजासाठी द्यायला हवे, असे सांगतानाच आगामी काळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाला अधिक चालना देण्याचे काम केले जाईल, असेहि एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : No infighting in alliance, Shinde advises Dhangarekar: Focus on unity.

Web Summary : Deputy CM Shinde urged Dhangarekar to avoid disputes within the ruling coalition. He emphasized maintaining law and order in Pune, promising zero tolerance for criminals. Shinde highlighted government initiatives, including farmer support and education funding, reaffirming commitment to public welfare and social harmony.
टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेravindra dhangekarरविंद्र धंगेकरShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस