शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

आता माघार नाही...जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलगिरी व्यक्त करणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 6:14 PM

आम्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाची परवानगी व शहीदांच्या शोकसभेचे निमंत्रण देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेलो होते.

ठळक मुद्देअशोक इंगवले यांच्या बंधूंची मागणी  

बारामती: चूक नसताना पोलिसांनी  भाऊ आणि त्याहीपेक्षा देशाच्या एका सौनिकाचा अपमान करत त्याला मारहाण केली. ही घटना अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे जोपर्यंत पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी माझा लहान भाऊ अशोक याला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत आमच्या गावात त्याचा जाहीर सत्कार करत दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दात अशोक इंगवले यांचे मोठे बंधू सेवानिवृत्त सैनिक किशोर इंगवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना बारामतीपोलिसानी केलेल्या मारहाणीच्या घटनेप्रती संताप व्यक्त केला. अशोक इंगवले यांना रविवारी (दि. १७) बारामती तालुका पोलीस ठाण्यात मारहाण झाली. यावेळी प्रत्यक्षदर्शी म्हणून किशोर इंगवले याठिकाणी उपस्थित होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी किशोर यांना देखील धक्काबुक्की केली. या घटनेविषयी बोलताना किशोर इंगवले म्हणाले, आम्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाची परवानगी व शहीदांच्या शोकसभेचे निमंत्रण देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेलो होते. यावेळी माझ्यासह अशोक व एक लहान मुलगा आमच्या सोबत दुचाकीवर होता. आम्ही ट्रीपल सीट आलो म्हणून आम्हांला आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. आम्ही त्यांना आम्ही कोणत्या कामासाठी आलो आहोत ते सांगितले. परंतु ते ऐकून न घेता. आम्हाला धक्काबुक्की करत ठाणे अंमलदाराच्या कक्षात नेण्यात आले. आम्ही रीतसर दंडाची पावती फाडतो, असे म्हणालो असता त्या कक्षातून ढकलत आम्हाला बाहेर काढण्यात आले. तसेच यावेळी अशोक याच्या अंगावरील वर्दीचाही सन्मान न राखता त्यालाही धक्काबुक्की करण्यात आली. सैन्याच्या वर्दीचा केलेला अपमान, धक्काबुक्की, शिवीगाळ सहन न झाल्याने अशोक याने रागाच्या भरात तेथील खुर्ची तोडली. यावेळी त्याच्या अंगावर आठ-नऊ पोलिसांनी झडप टाकली. व त्याला महिला पोलिस कर्मचा?्यांच्या कक्षाच्या नजीक असणाऱ्या सीसीटीव्ही नसणाऱ्या खोलीत नेऊन बेड्या ठोकल्या. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता मलाही ढकलून देण्यात आले. खोलीत अशोक याला बेदम मारहाण करण्यात आली. महिला पोलिसांनी देखील त्याला मारले. सुमारे दीडतास त्याच्या हातात बेड्या होत्या. मी येथील पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना हा प्रकार थांबवण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशोक याच्या हातातील बेड्या काढण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी बेडीची चावी हरवली आहे असे उत्तर दिले. या प्रकारामुळे आम्हाला प्रचंड धक्का बसला होता. आम्ही ज्या कामासाठी आलो ते ऐकूनही न घेता पोलिसांनी थेट मारण्यास सुरूवात केली. माझी १८ वर्षे सैन्यदलात सेवा झाली आहे. देशाची सेवा करताना कधीही कर्त्यव्यात आम्ही कसुर केली नाही. देशाचा अभिमान असणारी वर्दी अंगावर चढवताना दिलेली शपथ आजही स्मरणात आहे. मात्र पोलिसांना त्यांच्या खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेचा व दिलेल्या शपथेचा विसर पडलेला दिसतो. जो सैनिक दुसऱ्या क्षणाला देशासाठी बलीदान देण्याची तयारी ठेवतो. त्यालाच जर अशी वागणुक मिळत असेल तर हा संपूर्ण सैन्यदलाचा अपमान आहे, अशा शब्दात किशोर इंगवले यांनी आपल्या भावना मांडल्या. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान