शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

फुरसुंगीचा महापालिकेत समावेश ; उपयोग मात्र शून्य : विकासकामे प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:35 AM

कचरा डेपोच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर फुरसुंगी गाव पालिकेत घेण्यात आले..

ठळक मुद्देफुरसुंगीतील अनेक समस्या ‘जैसे थे’

जयवंत गंधाले - लोकमत न्यूज नेटवर्कफुरसुंगी :  कचरा डेपोच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर फुरसुंगी गाव पालिकेत घेण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत पालिकेपेक्षा बरी होती, अशी वेळ येथील नागरिकांवर आली आहे. पुणे महापालिकेला या  वाढलेला परिसराच्या विकासकामाची जबाबदारी पेलवत नाही, असे गेल्या वर्षातील कामातून दिसून आले आहे. अनेक प्रश्न रखडलेले आहे. ते कसे आणि कधी होणार हा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. 

सुमारे ७८ कोटी पाणी योजनेचे टाकीचे काम चालू आहे. पाईपलाईन टाकायचे काम चालू आहे. फुरसुंगी गावच्या प्रमुख रस्त्याचे महापालिकेने कोणतेही काम केले नाही. सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. गाव पालिकेत समाविष्ट झाले तरीही हे काम केले जात आहे. पालिकेत समाविष्ट होऊनसुद्धा पिण्याचे  पाणी मिळत नाही, पालिकेच्या आरोग्याच्या कोणत्याही सुविधा गावात नाहीत, मनपाचे शाळा नाही. बांधकामाच्या नोंदी अजून चालू झाल्या नाहीत. फक्त कर घेण्याचे काम चालू आहे. कोणत्याही सुविधा न देता म्हणजेच अग्निशामक कर, वृक्षसंवर्धन कर, जललाभ कर, जलनि:सारण लाभ कर, पथकर, मनपा शिक्षण उपकर, शिक्षण कर ( निवासी ) या प्रकारचे कर घेतले जातात. फुरसुंगी गावच्या विकासाबाबत अजून नियोजन नाही. पालिकेत गाव गेल्यापासून ११० मीटरच्या रिंगरोडचे नियोजन रखडले आहे. ग्रामपंचायत असतानाही सुरू झालेली आणि मनपा आल्यावर बंद पडून असलेली अर्धवट विविध विकासकामे अजून तशीच आहेत. ती बंद आहेत. त्यावर पुढे काहीही झाले नाही. कचरा डेपो बाधित वारसांमध्ये ५७ लोकांपैकी २९ लोकांचे काम झाले आहे. अजून २८ लोक त्यापासून वंचित आहेत.   ग्रामपंचायत असताना कॉन्ट्रक्ट बेसवर भरलेल्या कामगारांना अजून त्यांना पालिकेत समाविष्ट करून घेतले नाही. ग्रामपंचायतीमधील कायमस्वरूपावर असलेल्या कर्मचाºयांना ग्रामपंचायतीच्या नियमानुसार पगार मिळत आहे. पालिकेच्या नियमानुसार मिळत नाही.  नवीन बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवाने मिळत नाहीत. मनपाचे दवाखाने, हॉस्पिटल सुविधा नाहीत, अंतर्गत रस्ते नाहीत, नवीन ड्रेनेज सुविधा नाहीत, आठवडे बाजार सुविधा नाहीत, विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक सुविधा, महिलांसाठी योजना, अपंग, विकलांगसाठी योजना नाहीत, ओढे, नाले यांची दुरवस्था आहे. .......डांबरीकरणाची मागणी*  गावठाणातील वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी , हडपसरला जाणारा पर्यायी रस्ता करण्यासाठी दोनही कॅनॉलवर डांबरीकरणाची अशी मागणी विशाल हरपले यांनी केली आहे.  * अंत्यविधी आणि फुरसुंग दशक्रिया विधीच्या दुरावस्था जागा पुरत नाहीत. पत्रा शेड गळके आहे. लाईट नाहीत,पार्कींगची व्यवस्था नाहीत, जागा अपूरी पडत आहेत.  अंत्यविधी आणि दशक्रिया विधी या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नाही त्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संजय हरपले यांनी केली आहे..........दररोज शंभर टक्के टँकरची आवश्यकता आहे. मात्र पालिका ८0 ते ८५ टँकर देत आहे. संख्या वाढवून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर उरुळी व फुरसुंगी ही दोन गावे टँकरमुक्त कशी होतील, यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. - गणेश ढोरे, नगरसेवक, पुणे मनपा 

सध्या दररोज फुरसुंगीसाठी ८० ते ९० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फुरसुंगीचे पाणी पूर्णत: हा कालवा व कालव्याशेजारील विहिरीवर अवलूंबून आहे. ३३ एमएलडी प्लांट बांधण्यात येत आहे. सदर प्लांट कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- गौतम गावंड, पालिका अधिकारी, पाणीपुरवठा विभाग..............

टॅग्स :Puneपुणेfursungi garbage depotफुरसुंगी कचरा डेपोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीroad safetyरस्ते सुरक्षा