शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मानापानाचे राजकारण नको; कामाला प्रथम प्राधान्य द्या- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 2:15 AM

कृषी प्रदर्शनात कार्यकर्त्यांना फटकारले

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही म्हणून नावावरून गदारोळ चालू असल्याची गुप्त खबर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोहोचली. त्यावरून पवार यांनी याचे नाव नाही, त्याचे नाव नाही, हे काय चाललंय, नावाला काय करायचे आहे. मानापानाचे राजकारण न करता कामाला प्रथम प्राधान्य द्या, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना फटकारले.इंदापूर बाजार समिती आयोजित शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले की, सध्या तरुण मुलांमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम जाणवत आहेत. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोबाईलमध्ये पाहताना दिसले. तो धागा पकडून पवार यांनी जिल्हाध्यक्षांकडे मोर्चा वळविला. ते म्हणाले की, ते पाहा..! आता जिल्हाध्यक्षच मोबाईलमध्ये पाहतोय. पक्षाचे कसे होणार..! अरे आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण परंपरागत त्यांना चहापाणी विचारावे, त्या मोबाईलमध्ये काय बोटे घालताय. तालुक्यात पण लक्ष द्या. कारण राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मला वेळोवेळी इंजेक्शन द्यायला लावू नका. असाही दम कार्यकर्त्यांना भरला. कृषी प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका पाहून अजित पवार थक्क झाले. कारण त्यामध्ये एक हजार निमंत्रित मान्यवरांची नाव होती. त्याबाबतदेखील पवार यांनी आतापर्यंत मी देशात अशी कार्यक्रम पत्रिका पाहिली नसल्याचे सांगत निमंत्रण पत्रिकेचे कौतूक केले.घोडे बाजाराचे नुकतेच उद्घाटन केल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना देखील फटकारले. घोडे बाजार चांगला आहे. मात्र, राजकीय घोडे बाजार भरवू नका. एकमेकाला मानसन्मान द्या. तीच आपल्या पक्षाची परंपरा असल्याचे सांगायला पवार विसरले नाहीत. खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, सभापती प्रवीण माने यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासात्मक नियोजनामुळे सभापती अप्पासाहेब जगदाळे व संचालक मंडळाचे कौतुक केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस