शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांना कोणीही अडकवत नाहीये ;विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 20:56 IST

,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली.

पुणे : एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आला. मात्र,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. तसेच ज्यावेळी एसआयटी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी महाराष्ट्रातील एका ‘नारदाने’दिल्लीत जाऊन याबाबतची माहिती दिली. त्यामुळे  आम्ही त्या ‘नारदा’चा शोध घेत आहोत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.सारथी संस्थेला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि. २०) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की कोरेगाव भीमा मधील दंगलीच्या चौकशीला योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून 26/11 ची फेर चौकशी करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र,भाजप नेहमीच अशी सोईची व दुट्टी भूमिका घेत असते. त्याला काही अर्थ नाही.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा मंत्र्यांना ‘क्लिन चिट’ दिली. खरे तर त्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे होते. पण,चौकशी करायचीच नाही,अशी भूमिका मागील सरकारने घेतली होती. आमच्या सरकारने आरोप असणा-या माजी मंत्र्यांच्या चौकशीचा निर्णय घेतला असल्याने संबंधितांना चौकशीला सामोरे जावे लागेल.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न कोणीही करत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी सांगितले, की फडणवीस यांच्यासह सर्वांसाठी कायदा समान आहे. कोणाचेही तोंड पाहून कायदा काम करत नाही. मात्र,कायद्यापेक्षा कोणी स्वत:ला मोठे समजत असेल तर तो कायद्याला मानत नाही,असा त्याचा अर्थ निघतो. खरी- खोटी बाब न्यायालयात समोर येईल. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना काही गोष्टी लपविल्या गेल्या असतील तर त्या तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.मशीद उभारणीसाठी हवा ट्रस्ट ; विजय वडेट्टीवार‘‘राम मंदीर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. परंतु,मशीद उभारणीसाठीसुध्दा ट्रस्ट स्थापन झाला पाहिजे. देश सर्व जाती धर्मांचा आहे. देशातील धार्मिक तेढ संपवून राजकारण केले पाहिजे. परंतु, मोदी सरकारकडून याबाबत अपेक्षा करता येत नाही.’’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाPoliticsराजकारण