शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कोणी कितीही मोठा नेता असला तरी भाजपात बेशिस्तपणाला माफी नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:27 IST

केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील पक्षाचे मुख्यनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे मुंडे, खडसे समर्थकांची भावना: डावलण्याचे राजकारण पक्षाची हानी करणारे

राजू इनामदार-पुणे: पक्षशिस्तीचा भंग करणारा नेता कितीही मोठा असो, भारतीय जनता पार्टीत त्याला कधीही माफ केले जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले अशीच पुण्यातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे समर्थकांची भावना आहे. त्यामुळेच या नेत्यांचे समर्थक असूनही त्यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या विरोधात उघडपणे बोलायला कोणीही तयार नाही.खडसे यांच्यापेक्षाही पंकजा यांना मानणारा बराच मोठा गट पुण्यात आहे. त्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्यापासून अनेक आजीमाजी नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकार्यांचा समावेश आहे. राज्यात सत्ता, त्यात पंकजा यांना मंत्रीपद यामुळे हा गट सुखावला होता. आता पंकजा यांचे स्थान धोक्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने हा गटही धास्तावला आहे.पंकजा यांनी मंत्री असतानाही पक्षाच्या नेतृत्वाविरोधात छुपी आघाडी चालवली होती. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तर त्यांनी जवळपास जाहीरपणे बंडाचा झेंडा फडकावला. त्यामुळेच विधानपरिषदेसाठी त्यांचा विचारही झाला नाही.याचा अर्थ स्पष्ट करताना पक्षाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी व मुंडे यांचे समर्थक नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर म्हणाले, भाजपात बेशिस्त चालतच नाही. कोणी कितीही मोठा असला तरीही नाही. त्यामुळेच पंकजा यांना बाजूला ठेवण्यात आले. असे करताना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत हेही स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता पक्षात पदे भूषवणारे कोणीही मुंडे समर्थक पंकजा यांना उघडपणे सहानुभूती दाखवणार नाही.पंकजा किंवा एकनाथ खडसे ज्या मास बेसचा दावा इतकी वर्ष करत होते तो मास बेस आता राहिला नाही हेही पक्षश्रेष्ठींच्या मनावर बिंबवण्यात मुंडे विरोधकांना यश आले आहे असे मत गल्ली ते दिल्ली विविध पदे भुषवणाऱ्या  आणखी एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. ते म्हणाले, आपली ताकद पक्षामुळे आहे हे काहीजणांच्या लक्षात येत नाही. कार्यकर्तेही त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात. पक्षातले आपले खरे स्थान काय याचे भान नेत्यांनी ठेवायला हवे.ते राहिले नाही की काय होते याची खडसे, मुंडेच नाही तर आणखी बरीच उदाहरणे राज्यात आहेत अशी टिपणीही या नेत्याने केली.पंकजा यांना मानणारे नगरसेवकही पुण्यात संख्येने बरेच आहेत. तेही पंकजा यांना पक्षाने असे बाजूला ठेवल्याने धास्तावले आहेत. पुण्यात महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्याचे सगळे निर्णय राज्यातील श्रेष्ठीच घेतात. त्यांच्यापैकीच एक असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळेच चुकूनही वावगा शब्द किंवा पंकजा यांना पाठिंबा दर्शवणारी एखादी क्रुती आपल्याकडून होऊ नये म्हणून हे नगरसेवक सावध आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinod Tawdeविनोद तावडेPankaja Mundeपंकजा मुंडेEknath Khadaseएकनाथ खडसे