शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

माझ्या हातात जादूची कांडी नाही आणि मला स्वप्न दाखविण्याचीही सवय नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:03 PM

परिस्थितीला मुकाट्याने सामोरे जाऊन अंत करून घेण्यापेक्षा संघटितपणे अन्यायाविरुद्ध उभे राहू..

ठळक मुद्देकोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन

पुणे : प्रजा लोकशाही परिषदेच्या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आयोजिलेल्या कार्यकर्ता मेळाव्याचा प्रारंभीच्या उपस्थितीमुळे फज्जा उडाला़. सकाळी अकरा वाजताचा हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता गर्दी जमल्यावर सुरू करणे आयोजकांना भाग पडले़. त्यातच साडेतीन वाजता सभागृह खाली करायचे असल्याने मिळालेल्या जेमतेम वेळेत राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून, उपेक्षित-वंचित घटकांना एकत्र घेऊन आपण एक मजबूत वीण बांधली पाहिजे, असे आवाहन केले़. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होेत़े़. शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यातील प्रमुख अतिथींनी मात्र यावेळी पाठ फिरवली़. दरम्यान, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कल्याण दळे, गोर सेनेचे संदेश चव्हाण, प्रजा सुरक्षा पक्षाचे अध्यक्ष दशरथ राऊत आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला़.  दुपारी एकच्या सुमारास लक्झरी बसमधून आलेल्या गोर सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या सभागृहात लक्षणीय होती़. गोर सेनेच्या प्रमुखांचे भाषण होताच हे कार्यकर्ते सभागृह खाली करू लागले़. मात्र, सभागृहातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले़ या घडामोडीत दुपारी सव्वातीनच्या सुमारास मार्गदर्शन करण्याकरिता शेट्टी उभे राहिले़ माझ्या हातात जादूची कांडी नाही व मला स्वप्न दाखविण्याचीही सवय नसल्याचे सांगून, परिस्थितीला मुकाट्याने सामोरे जाऊन अंत करून घेण्यापेक्षा संघटितपणे अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असे आवाहन केले़. उपद्रव मूल्ये ज्यांकडे आहेत त्यांचे प्रश्न काही अंशी सुटतात, असे सांगून त्यांनी, आजची राजकीय परिस्थिती अस्थिर झाली असून, प्रस्थापितांचा वरवंटा सध्या सर्वत्र फिरत असल्याचे सांगितले़. अशावेळी आपल्या हाताला जे लागेल ते आपण मिळवूच, पण सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात आपली ताकद मुंबईला जाऊन दाखवून देऊ, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाElectionनिवडणूकGovernmentसरकार