शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

खेड तालुका शिवसेनेत नाही सारं काही आलबेल ! निष्ठावंत- आयारामांमध्ये सुप्त संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:16 IST

पक्षांतरांमुळे जसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहे तसेच शिवसेना भाजपाची अवस्था पण फार आनंदी आहे असे नाही....

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी चार इच्छुकांनी दिल्या मुलाखतीखेड तालुका शिवसेनेत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढलेली मुलाखतींमधून मतदारसंघाचा आढावा घेत निरीक्षकांनी उमेदवारांची केली चाचपणी

शिवाजी आतकरी- खेड :  आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेत मेगाभरती सुरु आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मेगा गळतीने पछाडले आहे. परंतु, या पक्षांतरांमुळे जसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहे तसेच शिवसेना भाजपाची अवस्था पण फार आनंदी आहे असे नाही. कारण या आयारामांमुळे निष्ठावंतांसमोरचा पेच वाढतो आहे. याचे उत्तम उदाहरण खेड तालुका शिवसेनेत पाहायला मिळते आहे. तिथे सारे काही आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही. 

खेड तालुका शिवसेनेत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. खेड तालुक्यातून चार जणांनी शिवसेना भवनात मुलाखती दिल्या आहेत.  त्यात आमदार सुरेश गोरे, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, तालुका प्रमुख रामदास धनवटे व माजी तालुकाप्रमुख ऍड. गणेश सांडभोर यांचा त्यात समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. या चौघांमध्ये राम गावडे, ऍड गणेश सांडभोर हे कट्टर शिवसैनिक असून प्रथमपासून शिवसेनेत आहेत. रामदास धनवटे हेही कडवे सैनिक आहेत मात्र तालुक्याच्या राजकीय साठमारीत ते सेनेपासून काहीकाळ अलिप्त होते. आमदार सुरेश गोरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. दरम्यान, निष्ठावंत सैनिक व राजकीय बेरजेत अलिकडे पक्षात आलेल्यांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुलाखती समाधानकारक झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणुकीतील अपयश, मतदारांमधील चर्चा, निवडून येण्यासाठी आवश्यक क्षमता या अनुषंगाने इन कॅमेरा पक्ष निरीक्षकांसमोर मुलाखती झाल्या. या मुलाखतींमधून मतदारसंघाचा आढावा घेत निरीक्षकांनी उमेदवारांची चाचपणी केली.       आमदार सुरेश गोरे यांच्या रूपाने खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघास शिवसेनेचा आमदार मिळाला. बिगर वादग्रस्त त्यांची कारकीर्द राहिली. शिवसेनेची ताकद गेली पंधरा वर्षे वाढत असताना लोकसभा निवडणुकीत  खेड तालुक्यातून सेनेची झालेली पीछेहाट त्या पक्षासाठी धोक्याची घंटा मानण्यात येते.  उमेदवारीसाठी मुख्य दावेदारी सुरेश गोरे यांचीच मानली जात आहे. असे असले तरी शिवसेनेने पानटपरीवाल्यास मंत्री केल्याचे उदाहरण आहे. या न्यायाने निष्ठावंत हा निकष लावला गेल्यास जिल्हाप्रमुख व अनेक निवडणुकांचा अनुभव असणाऱ्या राम गावडे यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो. विनम्र स्वभाव व तालुक्याची संपूर्ण माहिती, निवडणुकांचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. ऍड गणेश सांडभोर तालुका प्रमुख असताना त्यावेळी भरगच्च कार्यक्रम तालुकाभर झाले. याच काळात संघटनात्मक बांधणी तालुक्यात अधिक प्रभावी झाली तसेच पहिला सेनेचा आमदार सुरेश गोरे यांच्या रूपाने तालुक्यास मिळाला. उमेदवारीसाठी उच्च शिक्षित गणेश सांडभोर यांनी आपली डावेदारीह पक्षाकडे सांगितली आहे. रामदास धनवटे हे सेनास्टाईल आक्रमक नेतृत्व आहे. विविध आंदोलने  यातून आक्रमक भूमिका मांडणारे रामदास धनवटे यांनीही तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत सेनेचे संघटन करून ते कायम दखलपात्र राहिले. धनवटे हेही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. पक्षीय उलाढाल, युती- आघाडीची समीकरणे यात मोठा बदल झाला नाही तर या चॊघांपैकी एकास उमेदवारी मिळेल, असे दिसते. अर्थात सुरेश गोरे यांचे या श्रेयनामावलीत नामांकन अग्रभागी असेल.       तालुक्यातील राजकीय कानोसा घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी काहीशी धुसफूस आहे,वतशी सेनेतही सुप्तपणे दिसते. यावर उघडपणे कोणी बोलत नसले तरी निष्ठावंत व अलीकडे पक्षात आलेले असे सुप्त मतभेदाचे वर्णन करावे लागेल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुक्यातून आठ तर सेवेतून चार जणांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत.

टॅग्स :KhedखेडShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस