"नको बापट नको टिळक पुणेकरांना हवी नवी ओळख", पुण्यात पुन्हा फ्लेक्सबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:29 IST2022-02-04T17:28:45+5:302022-02-04T17:29:17+5:30
शहरात फ्लेक्सबाजीवरून एकमेकांना उत्तर देणे हे राजकीय वर्तुळात आधीपासूनच चालत आहे

"नको बापट नको टिळक पुणेकरांना हवी नवी ओळख", पुण्यात पुन्हा फ्लेक्सबाजी
पुणे : पुण्यात काही घडू शकत असं म्हणतात ते काही खोटं नाही. पुणेरी पाट्या, नवनवीन खाद्यपदार्थ संकल्पना पुण्यातूनच सुरु होतात. तर निवडणुकीच्या अनुषंगाने नवनवीन आयडियाही पुण्यातच पाहायला मिळतात. शहरात फ्लेक्सबाजीवरून एकमेकांना उत्तर देणे हे राजकीय वर्तुळात आधीपासूनच चालत आहे. त्यातच पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशीच फ्लेक्सबाजी पाहायला मिळली.
नगरसेवक धीरज घाटे यांनी नागरीकांच्या मदतीसाठी 'जिथे गरज तिथे धीरज' अशा प्रकारचा फ्लेक्स लावला आहे. त्यावरच प्रतिउत्तर म्हणून त्या फ्लेक्सखालीच २ लहान बॅनर लावण्यात आले आहेत. 'धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत, नको बापट - नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख' अशा प्रकारची वाक्ये त्या बॅनरवर लिहिण्यात आली आहेत. त्यामध्ये पुणेकरांना आता नवीन ओळख पाहिजे. असे बॅनर लावण्यात आले आहे. पुढे तुमचाच मतदार बंधू आणि भगिनी असंही लिहिण्यात आलं आहे.
पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्यावर इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शहरातील अनेक भागात आपल्या सौभाग्यवती बरोबर फ्लेक्स लावले जात आहेत. सोशल मीडियावरही नगरसेवकांकडून आपली काम दाखवली जात आहेत. प्रभागात आम्हीच निवडून येणार अशा प्रकारचे व्हिडीओ फेसबुकच्या माध्यमातून टाकले जात आहेत. त्यातच आता अशा प्रकारची फ्लेक्सबाजी दिसून आली आहे.