शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

प्रसिद्ध शहरांसाठीच्या विमानसेवेत पुणे अजूनही ‘उणे’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 6:48 PM

पुणे विमानतळ अजूनही देशातील अनेक प्रसिद्ध शहरांशी थेट जोडलेले नाही....

ठळक मुद्दे गुवाहाटी, सुरत, बडोदा, डेहराडून या शहरांना नाही कनेक्टिव्हिटी150 पुणे विमानतळावर दररोज विमानांची ये-जा होते. 90 विमानांच्या फेºया दररोज रात्री होतात..रात्रीही निर्बंध घातल्याने विमान उड्डाणे व उतरविण्यास मर्यादा

- राजानंद मोरे -

पुणे : मागील काही वर्षांपासून प्रवासी संख्येत वेगाने वाढ होणारे पुणेविमानतळ अजूनही देशातील अनेक प्रसिद्ध शहरांशी थेट जोडलेले नाही. गुवाहाटी, सुरत, बडोदा, पटना, इंदूर, वाराणसी यांसह १५ प्रसिद्ध शहरांमध्ये थेट पुण्यातून विमानसेवा नसल्याने प्रवाशांना मुंबईचाच आधार घ्यावा लागत आहे. हवाई दलाने पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या वापरावर दिवसाबरोबरच आता रात्रीही निर्बंध घातल्याने विमान उड्डाणे व उतरविण्यास मर्यादा आल्या आहेत. देशात प्रवासीसंख्येत वेगाने वाढ होणाऱ्या विमानतळांमध्ये पुण्याचा समावेश आहे. विमानतळावर दररोज १५० हून अधिक विमानांची ये-जा होते. जवळपास २५ हजारांहून अधिक प्रवासी या विमानतळाचा वापर करत आहेत. मागील काही वर्षांपासून विमानतळावरील सोयी-सुविधांमध्ये वाढ केली जात आहे. तसेच देशभरातील काही नवीन शहरांशीही पुण्याला विमानसेवेने जोडले जात आहे. मात्र, आता या उड्डाणांवर मर्यादा आल्या आहेत. एखाद्या शहरासाठी नव्याने विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक वेळ (स्लॉट) उपलब्ध होत नाही. पुणे विमानतळ हवाई दलाचे असल्याने अनेक उड्डाणांवर निर्बंध आहेत. सुरुवातीपासून दररोज सकाळी दोन ते अडीच तास विमानांची ये-जा ठप्प असते. आता रात्रीही उड्डाणे व विमाने उतरण्यावर बंधने आली आहेत. धावपट्टीच्या अस्तरीकरण (रिकार्पेटिंग)चे काम सुरू असल्याने या मर्यादा घालण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रात्री साडेदहा ते सहा या वेळेत केवळ पाच उड्डाणे व पाच विमाने उतरू शकतात. दररोज रात्री सुमारे ९० विमानांच्या फेºया होत होत्या. त्यामुळे सुमारे ४० विमाने पुणे विमानतळावर उतरतात. पूर्वी हे प्रमाण जवळपास ५० एवढे होते. तसेच जेट एअरवेज कंपनी बंद झाल्याने अद्यापही या कंपनीची मुंबई, इंदूर व सिंगापूर उड्डाणांसाठी कोणतीही विमान कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे हे स्लॉट रिकामे आहेत. हवाई दलाच्या निर्बंधांमुळे पुणे विमानतळ रायपूर, भुवनेश्वर, पटना, इंदूर, वाराणसी, अमृतसर, मंगलुरू, पोर्टब्लेअर, तिरुचिरापल्ली, गुवाहाटी, उदयपूर, सुरत, आगरताळा, बडोदा, डेहराडून आदी मोठ्या शहरांशी थेट जोडलेले नाही. या भागातून पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी, तसेच व्यवसायासाठी ये-जा करणाºयांची संख्या मोठी आहे. तसेच पर्यटन, धार्मिक, उद्योगाच्यादृष्टीनेही ही शहरे महत्त्वाची आहेत. पण थेट विमानसेवा नसल्याने मुंबई विमानतळाचा वापर अधिक केला जात आहे. ........पटना, वाराणसीसह काही शहरांसाठी पुणे विमानतळावरून विमानांचे उड्डाण होत होते. पण ही उड्डाणे रात्रीच्या वेळी असल्याने प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे विमान कंपन्यांनी ही सेवा बंद केली. अनेक प्रवासी रात्रीचा प्रवास करणे टाळत होते. या शहरांमध्ये रात्रीच्या वेळी विमानतळावरून घरापर्यंत जाणे तितकेसे सुरक्षित नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. परिणामी कमी प्रतिसाद मिळत असल्याने विमान कंपन्या पुढे येत नाहीत. अशा शहरांसाठी दिवसा विमानसेवा सुरू झाल्यास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा विमानतळ प्रशासनाला आहे.......या शहरांपासून पुणे दूर...रायपूर, भुवनेश्वर, पटना, इंदूर, वाराणसी, अमृतसर, मंगलुरू, पोर्टब्लेअर, तिरुचिरापल्ली, गुवाहाटी, उदयपूर, सुरत, आगरताळा, बडोदा, डेहराडून.........धावपट्टीच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे विमानसेवेवर बंधने आली आहेत. पूर्वी दिवसा काही निर्बंध होते, आता रात्रीही ही बंधने घालण्यात आली आहेत. पुणे विमानतळावरून दिवसा जवळपास ५० विमानांचे उड्डाण होते. ही उड्डाणे किमान ६० पर्यंत वाढू शकतात. असे झाल्यास इतर शहरे विमान वाहतुकीद्वारे थेट पुण्याशी जोडणे शक्य होईल. त्यासाठी हवाई दलाला सकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत अधिकचे स्लॉट उपलब्ध करून देण्याची विनंती केली जाणार आहे. हे स्लॉट उपलब्ध झाल्यास विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकेल.- अजय कुमार, संचालक, पुणे विमानतळ 

टॅग्स :Puneपुणेguwahati-pcगौहतीairplaneविमानpune airportपुणे विमानतळ