तक्रार देऊनही कारवाई होत नव्हती; तरुणाने उरुळी कांचन पोलीस स्टेशनवर चढून अंगावर ओतले पेट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:52 IST2025-03-06T17:49:56+5:302025-03-06T17:52:57+5:30
पोलिसांनी प्रसंगावधान बाळगून त्याला पकडून छतावरून खाली आणल्याने पुढील दुर्घटना टळली

तक्रार देऊनही कारवाई होत नव्हती; तरुणाने उरुळी कांचन पोलीस स्टेशनवर चढून अंगावर ओतले पेट्रोल
उरुळी कांचन : पुण्याच्या उरुळी कांचन भागात एका तरूणानं पोलीस ठाण्याच्य छतावर जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान बाळगून त्याला पकडून छतावरून खाली आणले व पुढील दुर्घटना टळली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने अवैध मटका जुगाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. यावेळी मटका चालकाच्या हे लक्षात येताच त्याने या तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दिनांक १ ) रोजी सोरतापवाडी गावच्या हद्दीतील गॅलेक्सी लॉजच्या पाठीमागे असणाऱ्या एका पत्राच्या शेडमध्ये घडली. त्यांनतर तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत आला होता. तक्रार दाखल करून २४ तास उलटूनही पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नव्हता. त्याच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या छतावर चढून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांच्या प्रसंगावधानाने त्याला छातीवरून खाली आणले. त्यानंतर पोलिसांनी अवैध धंद्यावर आणि त्या आरोपीवर कारवाई केली.
तक्रार देऊनही कारवाई होत नव्हती; तरुणाने उरुळी कांचन पोलीस स्टेशनवर चढून अंगावर ओतले पेट्रोल#pune#urulikanchan#policepic.twitter.com/a5Vc4j7cRy
— Lokmat (@lokmat) March 6, 2025
आरोपीकडून पत्त्याच्या जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ३ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध मुं.जु.का.क १२ (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. रविंद्र सुखदेव अवचट (वय ३५, रा. नायगाव, ता. हवेली), विनोद जगन्नाथ लोंढे (वय ३८, रा. नायगाव ता. हवेली), सुनिल भगवान खलसे (वय ३८, रा. कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली), वसंत दत्तात्रय लोंढे (वय २७ रा. कुंजीरवाडी माळवाडी, ता. हवेली), सर्फराज शहानुर मनीयार (वय ३०, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली), शरद विठ्ठल कर्डे (वय ३२, कुंजीरवाडी, मगरवाडी ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी सुमित वाघ यांनी फिर्याद दिली आहे.