शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
4
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
5
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
6
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
7
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
8
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
9
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
10
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
11
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
12
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
13
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
14
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
15
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
16
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
17
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
18
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
19
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
20
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार

निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरण; पुणे पोलिसांकडून अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:21 IST

घायवळवर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेक तक्रारदार त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत असल्याने आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता

पुणे: गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड नीलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता. त्याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस दलाली एका पोलिस निरीक्षकासह दोघांना नोटीस बजावली आहे. त्यावेळी हे दोघे जिल्हा विशेष शाखेत (डिएसबी) येथे कार्यरत होते. त्यांना पासपोर्टसंदर्भातील चौकशीबाबत हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ याने २०१९ मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढला आहे. तेथील राहता पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट काढला. त्यावेळी कागदपत्रांची व राहत्या पत्त्याची पडताळणी स्थानिक पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल स्वच्छ दाखवण्यात आला असा संशय व्यक्त झाला आहे. कदाचित त्याच्या आडनावातील हेराफेरीमुळे गुन्हे प्रणालीतून त्याचे नाव सुटले असावे असा कयास लावला जातो आहे. मात्र, दुसरीकडे ‘डीएसबी’मध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना तो माहिती नसावा असे देखील नाही असा संशय व्यक्त केला जातोय.

या प्रकरणाची नोंद पुणे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्रांचा तपशील मागवून चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान अहिल्यानगर पोलिसांनी दिलेल्या अहवालात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने, विशेष शाखेतील पासपोर्ट विभागात असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नीलेश घायवळ सध्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून, त्याच्या टोळीवर पोलिसांनी अलीकडेच आर्थिक तपास आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पासपोर्ट प्रकरणात आडनावाच्या नवीन घडामोडी समोर आल्याने त्याला मदत कोणी केली आणि कोणाच्या संगनमताने पासपोर्ट पडताळणी पार पडली, याकडे लक्ष लागले आहे.

नीलेशवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता...

नीलेश घायवळवर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेक तक्रारदार त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्याने दुसऱ्या व्यक्तीचे सिमकार्ड घेऊन वापर केला असल्याचे देखील समोर आले असून, त्यासंदर्भाने देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nilesh Ghaywal Passport Case: Pune Police Investigate Ahilyanagar Police

Web Summary : Pune police are investigating Ahilyanagar police regarding a passport obtained by gangster Nilesh Ghaywal using false documents. Two officers are being questioned about discrepancies in the verification process, raising suspicions of collusion and oversight, despite Ghaywal's criminal record.
टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPune Crimeपुणे क्राईम बातम्याpassportपासपोर्टMONEYपैसाAhilyanagarअहिल्यानगर