Pune Water News: रविवारपासून सर्व पेठांमधील रात्रीचा पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 21:25 IST2022-01-13T21:25:23+5:302022-01-13T21:25:32+5:30
पर्वती जल केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पर्वती एल.एल.आर टाकीच्या मुख्य पाण्याच्या लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची लाईन जोडण्याची कामे होणार आहेत

Pune Water News: रविवारपासून सर्व पेठांमधील रात्रीचा पाणीपुरवठा बंद
पुणे : पर्वती जल केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पर्वती एल.एल.आर टाकीच्या मुख्य पाण्याच्या लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची लाईन जोडण्याची कामे होणार आहेत. त्यामुळे रविवारपासून (दि़१६ जानेवारी) ते शुक्रवार दि़ २१ पर्यंत शहरातील सर्व पेठांमधील रात्री १० ते पहाटे ३.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी याबाबत माहिती दिली. पाणीपुरवठा बाधित होणाऱ्या भागात, शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ, नाना पेठ येथील भागांना या कालावधीत रात्रीचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, दिवसाही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.