शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Video: रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड; बुलेटबाजांचा धुडगस, फटाक्यांच्या आवाजाने पुणेकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:04 IST

बुलेटच्या फटाक्याच्या आवाजाने सर्वसामान्य नागरिक घाबरतात, लहान मुले महिला आवाजामुळे दचकतात, परिणामी अपघाताची शक्यता असते

किरण शिंदे 

पुणे: बुलेटच्या फटाक्यांचा धडाधड आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकीमुळे वाघोलीकर त्रस्त झाले आहेत. रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड आवाज करत जाणाऱ्या या बुलेटबाजांमुळे पादचारी आणि विशेषतः जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी वाघोली परिसरात रात्री अपरात्री धुडगूस घालणाऱ्या या बुलेटबाजांना आवर घालावा अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत.

प्रत्यक्षात बुलेट ही आकर्षक दुचाकी.. रस्त्याने धडधड करत धावणारी बुलेट अनेकांची लक्ष वेधून घेते.. मात्र मागील काही वर्षांपासून बुलेट ही वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.. या बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून अनेक टवाळखोर तरुण फटाक्यांचा आवाज काढतात. रस्त्याने जाणाऱ्या या अशा दुचाकीमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरतात, लहान मुले महिला अचानक येणाऱ्या या आवाजामुळे दचकतात. परिणामी अपघाताची शक्यता असते.. त्यामुळे अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट बाजार वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.  मागील काही दिवसांपासून पुण्यातील वाघोली परिसरात अशाच या बुलेटबाजांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. रात्री अपरात्री ही टार्गेट मुलं घोळक्याने बुलेट घेऊन येतात आणि फटाक्यांच्या आवाजाने रात्रीची शांतता भंग करतात. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र पोलीस या बुलेटबाजांना आवर घालण्यात कमी पडताना दिसत आहेत. 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुणे वाहतूक पोलिसांनी  बुलेट गाडीचे सायलेन्सर मॉडीफाय करून कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्यांवर कारवाई केली होती. १७६८ बुलेटच्या मॉडीफाय सायलेन्सर वर बुलडोजर फिरवला होता. मात्र असं असलं तरीही ही मोहीम आणखी तीव्र करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेbikeबाईकPoliceपोलिसpollutionप्रदूषणSenior Citizenज्येष्ठ नागरिकtraffic policeवाहतूक पोलीस