शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त पोलीस उपायुक्त तेली यांनी स्वीकारला पदभार

By admin | Updated: May 20, 2015 01:07 IST

परिमंडळ तीनचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी चिंचवडमधील कार्यालयात पदभार स्वीकारला.

पिंपरी : परिमंडळ तीनचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी चिंचवडमधील कार्यालयात पदभार स्वीकारला. डॉ. राजेंद्र माने यांची पुण्यातील गुप्तवार्ता विभागात बदली झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. तेली यांची १५ मे रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात नेमणूक झाल्यानंतर १८ मे रोजी त्यांच्याकडे परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. या अगोदर ते औरंगाबाद ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षकपदावर कार्यरत होते. बेळगाव, रायबाग येथील हंदीगुंद हे डॉ. तेली यांचे मूळ गाव आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण याच गावी झाले. महाविद्यालयीन शिक्षण बेळगावात, तर एमबीबीएसचे शिक्षण मंगळूर येथे झाले. २०१०मध्ये आंध्र प्रदेश केडरमधून भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. डिसेंबर २०१२मध्ये महाराष्ट्रात नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमीत तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचे पहिले पोस्टिंग झाले. फेबु्रवारी २०१४मध्ये औरंगाबाद ग्रामीणला अप्पर पोलीस अधीक्षक पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी १ वर्षे ३ महिने काम केल्यानंतर पुणे पोलीस आयुुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. डॉ. तेली यांच्या पत्नी रायगड येथे जिल्हाधिकारी आहेत. तसेच मोठे बंधू आयआरएस अधिकारी आहेत. बंधूंनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर लगेचच बंगळुरू येथे जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. यूपीएससीमध्ये यश मिळाले आणि त्यांची ‘इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस’साठी निवड झाली. पत्रकारांशी बोलताना डॉ. तेली म्हणाले, ‘‘यापूर्वी ग्रामीण पोलीस दलात काम केले असून, शहरातील ही पहिलीच पोस्टिंग आहे. ग्रामीण आणि शहरातील कामाची पद्धत वेगळी असते. शहरात कामाचा वेग अधिक असतो. शहराविषयी माहिती जाणून घेत असून, त्यानुसार आखणी करणार आहे.’’