शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ग्रामपंचायतींचा कारभार हाताळताना नवनियुक्त प्रशासकांची होणार दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 12:25 PM

नेमलेल्या प्रशासकाकडे केवळ एकच ग्रामपंचायत नाही तर सात-आठ ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळायचा आहे.

ठळक मुद्देखेडमधील ८३ ग्रामपंचायतींचा समावेश: पंचायत समितीचेही कामकाज सांभाळावे लागणार

राजगुरुनगर: खेड तालुक्यात ८३ ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्ति आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामपंचायतीवर नेमण्यात आलेल्या प्रशासकांना पंचायत समितीचा आपल्या विभागातील कामकाज सांभाळून ग्रामपंचायतीना भेटी देणे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणासाठी अंतर आणि वेळेचा विचार करता दमछाक होणार आहे.तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भावही तालुक्यात वाढत चालला आहे. १०० हून अधिक गावांत बाधित आढळत आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत चालली असून ती रोखण्याचे काम करत असतानाच गावकारभाऱ्यांना आता पायउतार व्हावे लागले आहे. नेमलेल्या प्रशासकाकडे केवळ एकच ग्रामपंचायत नाही तर सात-आठ ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळायचा आहे. याशिवाय पंचायत समितीत ज्या विभागात हे प्रशासक काम करत आहे तेही त्यांना साभाळायचे आहे. एकूणच कामाचा अतिरिक्त ताण या प्रशासकांना देण्यात आल्यामुळे कोरोना काळात गावकारभार कसा पाहणार हे महत्वपूर्ण ठरणार आहे.तालुक्याचे पुर्व आणि पश्चिम असे विभाजन होत असते. प्रशासकांची नियुक्ती करताना एकाच रस्त्यावर अथवा एका परिसरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर करण्याएवजी पूर्वेकडील काही गावे आणि पश्चिमेकडील काही गावे अशी गावे देण्यात आली आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणामध्येच प्रशासकांचा जास्तीत जास्त वेळ जाणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये ग्रामपंचायतीकडून राबविण्यात उपाययोजनांवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. एकूणच प्रशासकांकडे दिलेल्या ग्रामपंचायती पाहिल्या तर त्यांची गळचेपी केली असून कामाचा बट्ट्याबोळ होणार हे मात्र निश्चितच आहे.  ... राजकीय लाभासाठी इच्छूकांची धडपडकोरोनाकाळातच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहे़. त्यांच्याकडे सात-आठ ग्रामपंचायती असून अतिरिक्त कामाचा ताणही वाढत आहे. त्यामुळे गावातील उपाययोजनावर काम कसे होणार हा प्रश्न होता. मात्र, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी इच्छूकांनी आतापासूनच आखणी करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या वॉर्डात निर्जंतुकीकरण यासंह अन्य उपाययोजना स्वत:हून राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही कामे इच्छुकांच्या पत्त्यावर पडणार हे मात्र नक्की आहे. 

... नेमलेले प्रशासक आणि ग्रामपंचायती१) एस.एन. मंहकाळे: रानमळा, वडगाव पाटोळे, वेताळे, साबुर्डी, दोंदे, कडुस, कडध़े़२) बाळासाहेब ओव्हाळ: कुरकुंडी, किवळे, चांदुस, तोरणे बु., चिबंळी, शेलु, पिपंरी बु., आसखेड खु., कोरेगाव बु., तळवडे, गोनवडी, बिरदवडी़३) एस.बी.कारंडे: चांडोली, कनेरसर, पाडळी, पागंरी, खराबवाडी, कुरुळी, चिंचोशी, निमगाव, जऊळके बु., खरपुडी बु., वाकी खु.४) ए.एन.मुल्ला: नाणेकरवाडी, भोसे, दावडी, रेटवडी़५) एस.डी.थोरात: वासुली, सावरदरी, वराळे, म्हाळूंगे, कान्हेवाडी तर्फे चाकण, अहिरे, हेद्रुज, गडद, पाळु, मेदनकरवाडी, शिंदे, सांगुर्डी, करंजविहिरे, शिवे़६) जी.पी.शिंदे: गोलेगाव, रासे, धानोरे, केळगाव, खरपुडी खु., विºहाम, औदर, मोई, कोयाळी तर्फे चाकण, मरकळ, चºहोली खु., वाफगाव़७) जीवन कोकणे: कान्हेवाडी बु., चिंचबाईवाडी, पुर, तुकईवाडी, मोहकल, वाकळवाडी, गोसासी, काळुस, कमान, खरोशी, टोकावडे, भोरगिरी़८) बाळकृष्ण कळमकर: टाकळकरवाडी, वरची भाबुंरवाडी, येणिये बु., वांद्रा, औंढे, वाजवणे, कुडे खु., कळमोडी, आंबोली, घोटवडी़ 

टॅग्स :Khedखेडgram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या