शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पुणे शहरात काय सुरू काय बंद? महापालिकेची नवीन नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:24 IST

थोड्या जास्त पॉझिटिव्हिटी रेट चा फटका. पुणे लेव्हल ३ मध्ये

महापालिकेकडूनही शहरात अनलॉक 

दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहार राहणार सुरू : संध्याकाळी पाच नंतर मात्र संचारबंदी आणि जमावबंदीही 

पुणे : राज्य शासनापाठोपाठ पुणे महापालिकेने 'अनलॉक' जाहीर केले असून दैनंदिन स्वरूपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवता येणार असले तरी संध्याकाळी पाच नंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे. पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पास शिवाय प्रवास करू शकणार आहेत. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी दिले. येत्या सोमवार ( दि. 7 जून) पासून या सुधारीत नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बॅंका, सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था आठवडाभर काम करू शकणार आहेत. पुणे आणि खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डासाठी देखील हे आदेश लागू आहेत. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक ३० जून २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभाराहील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णतः बंद राहतील.सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू  राहणार असली तरी शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू ठेवता येणार आहे. शहरातील हॉटेलांसह, खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत. 

जवळपास चार महिन्यांनी पीएमपीची बस सेवा ५०  टक्के आसन क्षमतेने सुरू होणार आहे. नाटयगृहे तसेच चित्रपटगृहे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून धार्मिक, सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रम फक्त ५० टक्के क्षमतेने घेता येणार आहेत. सलून, स्पा आणि ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल, सिनेमागृह  नाट्यगृह. संपूर्णतः बंद राहणार आहेत. 

---//---काय राहणार सुरू१. वकील, सी.ए यांची कार्यालये२. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट (आसन क्षमतेच्या ५० टक्के)सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा घरपोच सेवा रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील.३.  उद्याने,  खुली मैदाने केवळ चालणे व सायकलिंगसाठी 

आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते सकाळी ०९४. सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी क्षमतेने ५. सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-१९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील. ६. शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त  ५० टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. ७. सर्व आउटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी ०५.०० ते ०९.०० या वेळेत सुरु राहतील.८. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम ( ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार). 

९. लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी१०. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी११. विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा , निवडणुका या ५० टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी 

१२.  ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारीचार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील.१३. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. 

१४.  ई-कॉमर्न सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील. 

१५. सार्वजिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने  सुरु राहणार आहे.-----व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा,  आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. या ठिकाणी वातानुकूल सुविधा (एसी) वापरता येणार नाही.-----माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त. ३ व्यक्ती (चालक, क्लीनर, मदतनीस) यांना इतर प्रवाशांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी राहील. खाजगी वाहनातून, बस तसेच लांब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधील ठिकाणी थांबायचे असल्यास ई-पास असणे बंधनकारक राहील.   ----- 

मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा सुरु राहील.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस