शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नात्यास काळीमा :शरीर सुखास नकार दिल्याने पुतण्याने केली काकूची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:42 IST

संगीता मला वाचवा, वाचवा असे मोठ्याने ओरडत होत्या. मात्र अंधाराचा फायदा घेवून शिवाजी पळून गेला. 

ठळक मुद्देनात्याला काळिमा : पुतण्याने केली काकूंची हत्या पुणे जिल्ह्यातील मंचर जवळील घटना

पुणे (मंचर) : शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या  काकूवर पुतण्याने हत्याराने वार करुन तिचा निर्घृण खुन केला आहे. ही घटना जुन्नर येथे पहाटे  ४.४५च्या दरम्यान घडली. संगीता देविदास साळवे,असे खुन झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी पुतण्या शिवाजी गेणू साळवे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

        मंचर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास साळवे यांनी मंचर पोलीसांत फिर्याद दिली आहे. साळवे त्यांची आरोग्य सेविका पत्नी संगीता व दोन मुले यांच्यासह साकोरी येथे राहण्यास आहेत . मंगळवारी रात्री त्यांची पत्नी  घराच्या ओट्यावर असलेल्या कॉटवर झोपली होती. तर मुलगा राहुल व मुलगी त्रिवेणी घरामध्ये झोपले होते.  देविदास यांनी आई आजारी असल्याने ते स्वतः बहिणीच्या घराच्या शेजारील रुममध्ये झोपले होते. आज पहाटे ४.४५ वा. घराच्या बाहेर आरडाओरडा झाला. साळवे यांनी बाहेरुन पाहिले असता त्यांचा पुतण्या शिवाजी गेणू साळवे पत्नी संगीता हिस हत्याराने जोरजोरात मारत होता.  यावेळी संगीता मला वाचवा, वाचवा असे मोठ्याने ओरडत होत्या. मात्र  अंधाराचा फायदा घेवून शिवाजी पळून गेला. 

       जखमी संगीताने सांगितले की, पुतण्या शिवाजी हा मी झोपलेली असताना तेथे येवून मला त्याने झोपेतून उठविले व शारीरिक सुख दे असे म्हणाला. मी त्यास शारिरीक संबंध ठेवण्यास विरोध केला म्हणून त्याने चिडून जावून हत्याराने वार केले. दरम्यान जखमी तिच्या डोक्यास, तोंडास, डाव्या हातास, उजव्या पायास गंभीर जखमा झाल्या होत्या. वाहनातून तिला उपचारासाठी सुरुवातीला आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले .नंतर नारायणगाव येथील दवाखान्यात उपचार करुन पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्या  उपचारापुर्वीच मरण पावल्याचे घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरMurderखूनPoliceपोलिसCrimeगुन्हा