शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची विजयाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: February 24, 2017 02:16 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँॅग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कारी-उत्रौली गटातील

भोर : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँॅग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कारी-उत्रौली गटातील तीनही जागा जिंकून राष्ट्रवादीने मोठ्या फरकाने एकहाती विजय मिळवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तर राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला नसरापूूर- भोलावडे गट काँग्रेसने ताब्यात घेतला आहे. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर चार जागा जिंकून भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आयटीआय येथे १० वाजता मतमोजणी सुरू झाली. या वेळी निकाल ऐकण्यासाठी बाहेर मोठ्या प्रमाणात समर्थकांनी एकच गर्दी केली होती. गटाची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात आली. वेळू-नसरापूर गटातून शिवसेनेचे विद्यमान सदस्य कुलदीप कोंडे यांच्या पत्नी शलाका कोंडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवून ३२११ मतांनी राष्ट्रवादीच्या सुनीता बाठे यांच्यावर विजय मिळवला. तर वेळू गणात शिवसेनेचे विद्यमान पंचायत समिती सदस्य अमोल पांगारे यांच्या पत्नी पूनम पांगारे व काँग्रेसच्या रेश्मा पांगारे यांच्यात दहाव्या फेरीपर्यंत मतदान बरोबरीत सुरू होते.मात्र, शेवटच्या फेरीत पूनम पांगारे यांना कुरुंगवडी व केळवडे गावात आघाडी मिळाल्याने शिवसेनेच्या पूनम पांगारे ११०३ मतांनी विजयी झाल्या. तर भोंगवली गणातून सुरवातील काँग्रेसचे रोहन बाठे व शिवसेनेचे विकास चव्हाण यांच्यात लढत झाली. मात्र, शेवटी राष्ट्रवादीचे मनोज निगडे व रोहन बाठे यांच्यात लढत होऊन बाठे यांनी ७२२ मतांनी विजय मिळवला.नसरापूर-भोलावडे गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही या वेळी युवक काँॅग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल आवाळे यांनी राष्ट्रवादीचे कुणाल साळुंके यांच्यावर १६६२ मतांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचा गड सर केला. नसरापूर गणात राष्ट्रवादीचे लह शेलार व काँॅग्रेसचे संतोष सोंडकर यांच्यात लढत होऊन शेलार यांनी १८६१ मतांनी विजय मिळवला, तर भोलावडे गणात राष्ट्रवादीच्या मंगल बोडके यांनी सुरवातीपासून आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवून त्यांनी काँग्रेसच्या भारती वरखडे यांच्यावर ७६० मतांनी विजय मिळवला. या गटात मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान झाले आहे.उत्रौली-कारी गट हा काँॅग्रेसचा बालेकिल्ला असून, येथून राष्ट्रवादीचे माजी सभापती रणजित शिवतरे सुरवातीपासून नीरा-देवघर धरण भागात, आंबवडे व वीसगावतही आपली आघाडी शेवटपर्यंत टिकवून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आणि काँॅग्रेसचे उमेदवार आनंद आंबवले यांच्यावर शिवतरे यांनी तब्बल ५,९९५ इतक्या मोठ्या फरकाने एकहाती विजय मिळवत काँॅग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. कारी गणातून राष्ट्रवादीच्या दमयंती जाधव यांनी काँग्रेसच्या रुक्मिनी घोलप यांच्यावर ३००९ इतक्या मोठ्या फरकाने एकहाती विजय मिळवला, तर उत्रौली गण हा काँॅग्रेसचा बालेकिल्ला असून, या गणात आत्तापर्यंत एकदाही राष्ट्रवादीला विजय मिळवता आला नव्हता. मात्र, या वेळी दरवेळी पराभूत होण्याची परंपरा खंडित करीत राष्ट्रवादीच्या श्रीधर किंद्रे यांनी काँग्रेसचे अनिल सावले यांच्यावर २४७७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. (वार्ताहर)