शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पुण्यात विधानसभेसाठी राष्ट्रवादीची " हाय डिमांड " : ८ जागांपैैकी ६ ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 8:45 PM

गेल्या १० वर्षात पुणे जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद घटली आहे..

पुणे : गेल्या १० वर्षात पुणे जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद घटली आहे, असा आकडेवारीनिशी दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील पक्षाच्या बैठकीत पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी ६ जागांची मागणी केली. सन २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणूकीत ज्या जागांवर जो पक्ष पुढे त्या जागा त्याला असे सुत्रही या बैठकीत मांडण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण तसेच पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे तसेच पुण्यातील अन्य प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांनीही ६ जागांच्या मागणीला दुजोरा दिला. सन २०१४ ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. कसबा व कॅन्टोमेंट वगळता हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड या ६ विधानसभा मतदारसंघात दुसºया क्रमांकावर होते. त्यामुळे या सर्व जागा राष्ट्रवादीकडे व कसबा कॅन्टोमेट या दोन जागा काँग्रेसला द्याव्यात अशी मागणी बैठकीत करण्यात आली.शहराध्यक्ष तुपे यांनी गेल्या १० वर्षातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील आकडेवारी सादर केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला असलेला नवमतदारांचा पाठिंबा वाढला असल्याचा दावा त्यांनी केला. सन २००९ मध्ये विधानसभा निवडणूक आघाडी करून लढवली होती, त्यावेळी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ४ जागा लढवल्या होत्या. मात्र आता तशी स्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढला असल्याचे त्यांनी विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी देत स्पष्ट केले. अजित पवार यांनी पुण्यातील इच्छुकांची मतदारसंघनिहाय माहिती घेतली. त्यात हपडसरमधून  सुरेश घुले, प्रशांत जगताप, वैशाली बनकर, शिवाजीनगरमधून श्रीकांत पाटील, निलेश निकम, कोथरूडमधून बंडू केमसे, स्वप्नील दुधाणे, पर्वतीमधून अश्विनी कदम, नितीन कदम, खडकवासला मधून रुपाली चाकणकर, दिलीप बराटे, सचिन दोडके आदींनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, जास्तीजास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस