शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शहरात प्रभाव टाकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

By admin | Updated: September 28, 2016 04:51 IST

पक्षाचे वर्चस्व नसलेल्या शहराच्या मध्य भागात चंचुप्रवेश करायचा, या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. पेठांमधील मतदारांना प्रभावित करण्यावर राष्ट्रवादीकडून

पुणे : पक्षाचे वर्चस्व नसलेल्या शहराच्या मध्य भागात चंचुप्रवेश करायचा, या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. पेठांमधील मतदारांना प्रभावित करण्यावर राष्ट्रवादीकडून भर दिला जात असून, त्यासाठी कार्यकर्ते प्रशिक्षित करण्यात येत आहेत. कोथरूड, कसबा व पर्वती या विधानसभा मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसते. पक्षाचे पालिकेतील पदाधिकारी, काही नगरसेवक यांचा विरोध डावलून शहराध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची पुनर्नियुक्ती करणे ही याची पहिली पायरी होती. आता दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या परिसरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या कार्यशाळा हा त्याचाच भाग आहे. या कार्यशाळांना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, महिला चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, युक्रांदचे संस्थांपक कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या नामवंतांना निमंत्रित करण्यात येते. त्यांची विविध विषयांवर कार्यशाळेत व्याख्याने होतात. या प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर, धर्मनिरपेक्ष विचाराच्या मतदारांमध्ये यामुळे पक्षाविषयी सहानुभूती निर्माण होईल, असाही हेतू त्यामागे आहे. संघटना स्तरावरून याची आखणी करण्यात येत असून, पक्षनेतृत्वाने त्यासाठी त्यांना मोकळीक दिली आहे.पक्षाने केलेल्या विकासकामांना फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर अशा माध्यमांमध्ये आवर्जून स्थान द्यावे अशा सूचना या कार्यशाळांमधून कार्यकर्त्यांना देण्यात येत असतात. तसे केले जात आहे किंवा नाही, याची माहितीही संघटनेत वरिष्ठ स्तरावरून घेतली जात असल्याचे समजते.पेठांमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. केंद्र व राज्यात त्यांची सत्ता असल्याने पालिकेतही सत्ता मिळविण्यासाठी ते आक्रमक झाले आहेत. त्यातूनच राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवकांचे पक्षांतर घडवून आणण्यात आले. मात्र, भाजपाला उत्तर न देता शांतपणे त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरून थेट मतदारांपर्यंत पोहोचावे, अशा प्रकारची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस राबवीत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळांमधून हाच सल्ला दिला जात असल्याचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. त्याचबरोबर, पक्षाचा उपनगरी तोंडवळा बदलून शहरी चेहरा मिळावा, यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासाठी पक्षसंघटनेतही जाणीवपूर्वक पेठांमध्ये राहणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. नेत्यांशी नको तर मतदारांशी संपर्कात राहा, पक्षाने केलेली विकासकामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा, असे त्यांना सांगण्यात येत आहे. मागील सलग १० वर्षे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे; मात्र एकदाही त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सुरुवातीला भाजपा-सेनेला बरोबर घेऊन नवा पॅटर्न करण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता राबविण्यात येत आहे. त्याची खंत वाटत असल्यानेच या वेळी एकहाती सत्ता यावी, अशी जाहीर अपेक्षा पक्षनेतृत्वाने व्यक्त केली. शहराच्या मध्य भागातील नगरसेवकांची संख्या वाढल्याशिवाय ते शक्य नाही. पक्षाने सत्तेच्या गेल्या १० वर्षांत केलेली विकासकामे थेट मतदारांपर्यंत पोहोचवली तर ते शक्य असल्याच्या विचारातून कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या वापराचेही खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.