शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Lakhimpur Kheri Violence: “PM मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत”; लखीमपूरवरुन सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 14:43 IST

Lakhimpur Kheri Violence: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारावर संताप व्यक्त केला.

पुणे: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात शिरलेली कार आणि त्यानंतर झालेला हिंसाचार यावरून देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारावर संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत, अशी टीका केली आहे. (ncp supriya sule criticised pm modi govt and bjp over lakhimpur kheri violence)

लखीमपूर हत्याकांडासारखी प्रकरणे आम्ही कधीच सहन करणार नाही. असा कुठलाही अन्याय कोणत्या महिलेवर आणि शेतकऱ्यांवर होणार असेल तर कोणाचीही सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तिथे लोक शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच केला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

शरद पवार बोलले, तीच पक्षाची भूमिका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचारावर आपले म्हणणे मांडले आहे. शरद पवार यावर बोलले असून, हीच पक्षाची भूमिका आहे. आम्ही खंबीरपणे कुठल्याही अन्यायाच्या विरोधात उभे राहणार. प्रियांका गांधी तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलजी यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू. लखीमपुरमध्ये एवढे सगळे होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर काहीच न बोलल्याचे आश्चर्य वाटते. ते कधीच अशा प्रकरणांवर बोलत नाहीत. गेल्या महिनाभरात बलात्कार घटना झाल्या तेव्हाही गप्प होते, आताही ते काही बोलले नाही, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, आता महात्मा फुले यांचे मूळ गाव असणाऱ्या खानवडीत मुलींची मोठी शाळा बांधली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात दिली.  याठिकाणी महात्मा फुलेंचे स्मारकही होईल. तसेच सातारा, खानवडी आणि पुणे अशा तीनही ठिकाणी मुलींच्या शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच राज्यातील ऐतिहासिक ठिकाणांचा विकास आणि डागडुजीवरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारPuneपुणे