राज ठाकरेंच्या वक्तव्याचा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:33 IST2022-04-08T17:22:15+5:302022-04-08T17:33:46+5:30
पुणे शहरातील कोंढवा येथे निषेध आंदोलन...

राज ठाकरेंच्या वक्तव्याचा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
पुणे : गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी मस्जिदीवरील भोंग्यांवर वक्तव्य केले होते. राज ठाकरेंच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज पुणे शहरातील कोंढवा येथे निषेध आंदोलन झाले.
आयुष्यात आपण सर्वांनी लहानपणापासून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सर्व समाजातील मित्रांसोबत राहत आपण लहानाचे मोठे झालो. अचानक आज कुणीतरी नेता येऊन म्हणतो की, या धर्माचा विरोध करा, त्या धर्माचा विरोध करा हे खरोखर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे कृत्य असून, या प्रवृत्तीचा आपण करू, तेवढा निषेध कमीच आहे. अशा प्रकारचे वातावरण हानीकारक असून भविष्यात आपण आपल्या पुढच्या पिढीला हे शिक्षण देणार आहोत का ....? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मा. नगरसेवक हाजी गफूर पठाण, प्रवक्ते प्रदीप देशमुख, मा. नगरसेविका नंदाताई लोणकर, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, मोहसिन शेख, डॉ. शंतनु जगदाळे, समीर शेख, दिपक कामठे, मेहबूब शेख, हसीना इनामदार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.