शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

डिजीटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ : सुप्रिया सुळे यांची टीका; नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा पुण्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:21 PM

रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी बोला, म्हणजे समस्या कळतील, अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.

ठळक मुद्देरस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी बोला, म्हणजे समस्या कळतील : सुप्रिया सुळेसरकार ‘हम करे सो कायदा’ या प्रमाणे वागत आहे : अजित पवार

पुणे : नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ झाला असून केवळ जाहिराती देऊन विकास होणार नाही. रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी बोला, म्हणजे समस्या कळतील, अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. नोटाबंदीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे पुण्यात निषेध मोर्चा सकाळी मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते़.अजित पवार यांनीही नोटाबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांना गरीब करणारा असून सरकार ‘हम करे सो कायदा’ या प्रमाणे वागत आहे. या निर्णयामुळे कोणीही समाधानी नसून नागरिक आपला रोष व्यक्त करीत आहेत. नोटाबंदी झाली तेव्हा आम्ही विरोध केला. त्यावेळी आंदोलनात कमी नागरिकांचा सहभाग होता. मात्र एक वर्षानंतर परिस्थिती बदलली असून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. एवढेच नाही विद्यार्थ्यांचे सहभागाचे प्रमाणही मोठे आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याची टीका केली, त्याची आठवण अजित पवार यांनी या वेळी करून दिली. नोटाबंदीमुळे देशाचा विकासदर घटला़ रद्द केलेल्या ९९ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या़ मग काळा पैसा गेला कोठे? त्यांना जर काळा पैसा बाहेर आणायचा होता, तर २ हजार रुपयांची नोट का काढली?

रॅलीत नागरिकांनी नोटाबंदीविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी फलकांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीagitationआंदोलनNote Banनोटाबंदी