टीव्हीवरील काही जाहिराती खटकतात. अतिरंजित वाटतात. क्वचित फसव्या वाटतात, अशा जाहिरातींविरुद्ध ग्राहक म्हणून आपल्याला तक्रार करता येते का? ती कुठे आणि कशी करावी?
- रजनी पाटील, सांगली.

जाहिरातीचा ग्राहकाच्या आवडी-निवडीवर खोलवर परिणाम होतो हे निर्विवाद सत्य आहे; पण आकर्षक, मोहक वाटणाºया जाहिराती सांगत असलेलं सर्व खरंच असतं असं नाही. अनेकदा जाहिराती खोटे, भ्रामक आणि अवास्तव दावे करतात. त्यांना ग्राहक भुलतात आणि स्वत:चं नुकसान करून घेतात. अशा भ्रामक जाहिरातींना आळा घालण्यासाठी ग्राहकांनी जाहिराती जागरूकपणे बघणं आणि काही चुकीचं वाटल्यास त्याची तक्रार करणं याची नितांत आवश्यकता आहे. आणि त्यासाठी विशिष्ट व्यवस्थाही आहे.

खोट्याजाहिराती आणि अरउक
दिशाभूल करणाºया जाहिरातींना आळा घालण्यासाठी १९८५ साली अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल आॅफ इंडिया (अरउक) ची स्थापना करण्यात आली. ही एक स्वयंसेवी वैधानिक नियामक संस्था आहे. यात जाहिरातदार, प्रसिद्धीमाध्यमं, जाहिरात कंपन्या आणि अन्य जाहिरातक्षेत्राशी निगडित तज्ज्ञांचा समावेश आहे.
(अरउक) ने भारतातील सर्व माध्यमांतील जाहिरातींसाठी नीतिनियम केले आहेत. ते पाळण्याची जबाबदारी जाहिरातक्षेत्राशी निगडित सर्वांची आहे.
(अरउक)तील ग्राहक तक्रार निवारण समिती ग्राहकांच्या तक्र ारींचं निराकरण करते. जाहिरातींना प्रमाणपत्र देते. जाहिरातींनी नीतिनियमांचं उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येते.

चांगल्या जाहिरातीची लक्षणं
१. जाहिरातीतील माहिती सत्याला धरून आणि प्रामाणिक असावी. ती फसवी नसावी.
२. जाहिरात ज्या समाजात दाखवण्यात येते तेथील सामाजिक/सांस्कृतिक मूल्यं, परंपरा यांचा अनादर करणारी नसावी.
३. जाहिरातींनी त्यांच्यावरील सामाजिक जबाबदारीचं भान ठेवावं.
४. समाजाला धोका असलेल्या उत्पादनाची जाहिरात करू नये.
५. कोणत्याही जाहिरातीत जाती-जमाती, वर्ण, राष्ट्रीयत्व, राष्ट्रध्वज यांची विटंबना नसावी.
६. मुलांच्या बाबतीतील जाहिरात त्यांच्या वयाला अनुरूप असावी. त्यात कोणतेही हानिकारक स्टंट नसावेत.
७. अश्लील आणि विकृत नसावी.
८. सिगारेट, मद्य, तंबाखू अशा अमली पदार्थ्यांची जाहिरात करण्यास मनाई आहे.
९. गुटखा जाहिरातीस आपल्या राज्यात बंदी आहे.
१०. जाहिरातीत निकोप स्पर्धा असावी.

तक्रार करायची तर?
१. ग्राहकांनी अरउक मध्ये तक्रार केली तरच पुढे कारवाई होऊ शकते. त्यामुळे खटकणाºया जाहिरातींविषयी तक्रार करता येतेच. त्यासाठी (ASCI) च्या ७१७/ई, ऑरस चेम्बर्स, अमृतवार मार्ग, वरळी, मुंबई- १८
दूरध्वनी : १-८००-२२-२७२४ येथे संपर्क करता येतो.
२. किंवा www.ascionline.org येथे आपल्या तक्रारीचं काय झालंय? याचा पाठपुरावाही करता येतो.
३.आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील जाहिरातींबद्दल आक्षेप असल्यास माहिती प्रसारण मंत्रालयाकडे त्यांच्या www.mib.nic.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवता येते.

(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्या आहेत.)