राष्ट्रवादीचे पदाधिकारीच एकमेकात जुंपले, केली पक्षातील राष्ट्रीय सरचिटणीसाच्या हकालपट्टीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:26 PM2021-04-25T16:26:52+5:302021-04-25T16:38:14+5:30

आमदार दिलीप मोहिते यांना बदनाम करण्याच्या प्रकरणावरून उडाली खळबळ

The NCP office bearers joined hands and demanded the removal of the party's national general secretary | राष्ट्रवादीचे पदाधिकारीच एकमेकात जुंपले, केली पक्षातील राष्ट्रीय सरचिटणीसाच्या हकालपट्टीची मागणी

राष्ट्रवादीचे पदाधिकारीच एकमेकात जुंपले, केली पक्षातील राष्ट्रीय सरचिटणीसाच्या हकालपट्टीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे खेड तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा

राजगुरूनगर : खेडचे आमदार दिलिप मोहिते यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून मोहिते व राष्ट्रवादी पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शेलेश मोहिते यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करावी, अन्यथा खेड तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शैलेश मोहिते हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा राष्ट्रीय सरचिटणीस असून आमदारांचा निकटवर्तीय असल्याने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे षडयंत्र साताऱ्यात नुकतेच उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे एका युवतीने या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातुन आमदार दिलीप मोहिते यांना शैलेश मोहिते, राहूल कांडगे यांनी हनी ट्रॅपमध्ये ओढत बदनामी करण्याची भिती दाखवून त्याच्याकडून लाखो रुपायांचा उखळण्याचा डाव आखला होता. त्याबद्दल्यात त्या तरूणीला एक लाख रुपये ऍडव्हास दिला होता. आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची यांची बदनामी करायची आहे. त्यासाठी तुझी मदत पाहिजे असे तरूणीला सांगून तु आमदार मोहिते यांचा पुतण्या मयुर मोहिते यांच्या माध्यमातुन आमदार मोहिते यांच्याकडे नोकरी माग व जवळीक निर्माण कर.  आमदारांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ नंतर आपण त्यांना बदनामीची भिती दाखवू. हे  प्रकरण पोलिस ठाण्यात नेण्याची भिती दाखविल्यानंतर आपल्याला पैसे मिळतील त्याबद्दल्यात तुला पैसे आणि पुण्यात फ्लॅट घेऊन देतो. या पद्धतीने प्लॅन रचून युवतीला सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र या हनीट्रॅपबाबत युवतीच्या मनाला न पटल्याबद्दल या युवतीने ठरलेला प्लॅन आमदार मोहिते यांचे पुतणे मयुर मोहिते यांना फोनद्वारे कळवला होता. 

याप्रकरणी मयुर मोहिते यांनी सातारा येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली असुन तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहुल किसन कांडगे (रा.चाकण, जि.पुणे) , सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी व राष्ट्रवादी पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते अरुण चांभारे, सुखदेव पानसरे, अरुण मुळूक यांनी पत्रकार परिषद घेऊन शैलेश मोहिते,राहूल कांडगे व सोमनाथ शेंडगे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून राष्ट्रवादी पक्षातून हाकलपट्टी करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा खेड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असा इशारा दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस कमिटीला पाठविण्यात आले असल्याचे पुणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The NCP office bearers joined hands and demanded the removal of the party's national general secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.