ncp mla chetan tupe corona positive | राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंना कोरोना!; अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित

राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंना कोरोना!; अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित

राज्यात एकामागोमाग एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तुपे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, रविवारी चेतन तुपे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला देखील हजर होते. (NCP MLA Chetan Tupe Corona Positive) 

चेतन तुपे यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून तब्येत चांगली असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहनही तुपे यांनी केलं आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकामागोमाग एक कोरोना बाधित होत असल्यानं खळबळ उडाली आहे. याआधी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पक्षाचे नेते आणि आमदार कोरोना बाधित होत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनता दरबार देखील दोन आठवड्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राजकीय दौरे आणि कार्यक्रम देखील रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ncp mla chetan tupe corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.