Vedanta Foxconn Deal : तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:50 IST2022-09-14T17:50:10+5:302022-09-14T17:50:56+5:30
सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून वादाला सुरूवात झाली आहे.

Vedanta Foxconn Deal : तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोमणा
सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉनवरून वादाला सुरूवात झाली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार होता. परंतु आता तो प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.
“मी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ, तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा,” असा खोचक टोला त्यांनी उदय सामंत यांच्या प्रतिक्रियेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला. “अडीच वर्ष खुप मोठा वेळ आहे. इतके वर्ष ते का बसले होते. ते खातं शिवसेनेकडे होतं. त्यातले काही लोक शिंदेसेनेत आहेत,” असंही त्या म्हणाल्या. हा राजकारणाचा विषय नाही. राजकारण हे गंभीर असतं. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अर्थिक बाबीचा प्रश्न आहे. सर्व नेत्यांनी एकत्र यावं, राजकारण बाजूला ठेवावं, ही गुंतवणूक मेरिटवर मिळाली होती, ती मेरिटवरच मिळाली पाहिजे. हे आताच्या सरकारचं अपयश असल्याचंही त्या म्हणाल्या.
कायम्हणालेहोतेसामंत?
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.