शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साकुर्डेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: August 8, 2015 00:42 IST

साकुर्डे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असले, तरीही सत्तास्थापनेसाठी त्यांना एका उमेदवाराची गरज भासेल. यात त्यांच्यावर काँग्रेस किंवा शिवसेना यांपैकी एकाशी

जेजुरी : साकुर्डे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असले, तरीही सत्तास्थापनेसाठी त्यांना एका उमेदवाराची गरज भासेल. यात त्यांच्यावर काँग्रेस किंवा शिवसेना यांपैकी एकाशी जुळवून घेण्याची वेळ आलेली आहे. साकुर्डे ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशी तिरंगी लढत असणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचपदाच्या उमेदवार माईसाहेब सस्ते यांच्या विरोधात सेना काँग्रेसच्या उमेदवारांनी एकमेकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने वॉर्ड क्र. १मध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. शेवटच्या टप्प्यात येथील लढतीचे चित्र दुरंगी झाले होते. तरीही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी ही लढत मोठ्या फरकाने जिंकली आहे. येथून माईसाहेब ऊर्फ पौर्णिमा हरिश्चंद्र सस्ते, सचिन अरुण थोपटे, तृप्ती नीलेश जगताप यांनी पराभूत उमेदवारापेक्षा दुपटीहून अधिक मतांनी विजय मिळविला आहे. वॉर्ड २ हा सुरुवातीला जनता दलाचा व नंतर काँग्रेसचा गेल्या ४० वर्षांपासून बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे सेना काँग्रेसची युती झाली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे इतर मागासवर्गीय जागेसाठी केवळ एक उमेदवार दिला होता. दोन महिला प्रवर्ग जागेवर उमेदवार उभे केले नव्हते. शिवसेनेच्या शैला जाधव आणि स्वाती सस्ते या उमेदवारांनी मोठी मुसंडी मारून काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पराभूत केले. तिसरा एकमेव काँग्रेसचा उमेदवार राहुल हरिभाऊ भोंगळे विजयी झाला आहे. वॉर्ड ३ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळखला जातो. येथे मात्र काँग्रेसचे विद्यमान सरपंच राजेंद्र ज्ञानोबा सस्ते आणि सुनील सुभाष चव्हाण यांनी विजय संपादन केला असून, राष्ट्रवादीच्या सविता जगताप निसटत्या मताधिक्याने विजयी झाल्या. येथे सेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. मतमोजणीनंतर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन उमेदवार, असे बलाबल निर्माण झाले आहे. (वार्ताहर)