शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात राष्ट्रवादी - भाजप आमनेसामने; आता भाजपकडून महाविकास आघाडी सरकारने 'विकासकाम दाखवा' स्पर्धेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 11:39 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप 'विकासाची पोलखोल' या स्पर्धा जाहीर केली आहे

ठळक मुद्देकाँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहराचा विकास खुंटला राष्ट्रवादीचा आरोप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप 'विकासाची पोलखोल' ही स्पर्धा जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्‍या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सत्ताधारी भाजपने उडी घेत महाविकास आघाडी सरकारला आव्हान केले आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील अशाच प्रकाराची घोषणा केली असून राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव 'विकासकाम दाखवा' ही स्पर्धा अयोपजित केली आहे. पहिल्या तीन जणांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास कामांवरून होणाऱ्या आरोप - प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार 'होर्डिंग वॉर' देखील पाहायला मिळाले होते. मात्र, आता महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ''विकासाची पोलखोल स्पर्धा" आयोजित केली. तर सत्ताधारी भाजपने ''विकासकाम दाखवा या'' स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र दिसून येत आहे.  “राज्यात मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प, स्वारगेट मल्टी ट्रान्सपोर्ट हब, चांदणी चौक बहुउद्देशीय वाहतुक प्रकल्प, बस खरेदी, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी विकासनिधी अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली.  भाजपचे सरकार सत्तेत असताना खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहराचा विकास खुंटला होता,” असा आरोप मुळीक यांनी केलाय.

स्पर्धेची उत्तरे ९९२२७४४६४४ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत

“महविकास आघाडी सरकारला जनतेच्या हिताचा कोणताच  घेता आला नाही. गोंधळलेल्या सरकारला घेतलेले निर्णय परत घेण्याची नामुष्की ओढवली. विकासकामांच्या नावाने हातात भोपळा आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच भीतीने राष्ट्रवादीची नौटंकी सुरू आहे. याला उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची उत्तरे ९९२२७४४६४४ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत. योग्य व समाधानकारक उत्तर देणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे,” असेही मुळीक यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसjagdish mulikजगदीश मुळीकMaharashtraमहाराष्ट्र