नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 23:21 IST2025-11-13T23:11:46+5:302025-11-13T23:21:24+5:30
पुणे-बंगळूरू मार्गावरील नवले पुलावर आज, गुरुवारी (दि. १३) सायंकाळी भीषण अपघात झाला.

नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
पुणे-बंगळूरू मार्गावरील नवले पुलावर आज, गुरुवारी (दि. १३) सायंकाळी भीषण अपघात झाला. सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या या पुलावर एका भरधाव कंटेनरने सुमारे २० वाहनांना धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ९ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज रोजी सातारा हायवेकडून येणाऱ्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची धडक होऊन झालेल्या अपघातात उपलब्ध जखमी आणि मयत व्यक्तींची माहिती पुढील प्रमाणे:
पल्स हॉस्पिटल येथील पेशंटची माहिती
१. सोफिया अमजद सय्यद (वय १५ वर्ष), व्यवसाय शिक्षण, राहणार रुपीनगर निगडी पुणे
२. रुकसाना इब्राहिम बुरान (वय ४५ वर्ष), व्यवसाय गृहिणी
३. बिस्मिल्ला सय्यद (वय ३८ वर्ष), व्यवसाय गृहिणी, राहणार खंडोबा माळ चाकण पुणे
४. इस्माईल अब्बास बुरान (वय ५२ वर्ष), व्यवसाय मजुरी, राहणार रुपीनगर निगडी पुणे
५. अमोल मुळे (वय ४६ वर्ष), राहणार काळेवाडी फाटा
६. संतोष सुर्वे (वय ४५ वर्ष), राहणार भूमकर नगर नरे
नवले हॉस्पिटल येथील पेशंट बाबत माहिती
१. सय्यद शालीमा सय्यद
२. जुलेखा अमजद सय्यद (वय ३२ वर्ष)
३. अमजद सय्यद (वय ४० वर्ष), राहणार भक्ती शक्ती रोड, निगडी पुणे
४. सतीश वाघमारे (वय ३५ वर्ष), राहणार शिरूर खांदाड नांदेड
५. सोहेल रमनुद्दीन सय्यद (वय २० वर्ष), राहणार निकोडो चाकण पुणे
६. शामराव पोटे (वय ७९ वर्ष), राहणार फ्लॅट नंबर ७०१ हिंजवडी पुणे
अडवांटेज हॉस्पिटल मार्केट यार्ड
१. अंकित सलीयन (वय ३० वर्ष), राहणार तारा वेस्ट आंबेगाव बुद्रुक पुणे
सिल्वर बर्च हॉस्पिटल भूमकर चौक
१. रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २५ वर्ष), राहणार लोणी, तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे मयत झाले आहे.