अपघातास जबाबदार कंटेनर चालकासह तिघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:23 IST2025-11-15T08:17:03+5:302025-11-15T08:23:39+5:30
Navale Bridge Accident: नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या कंटेनर चालकासह तिघांविरोधात सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अपघातास जबाबदार कंटेनर चालकासह तिघांविरोधात गुन्हा
पुणे - नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या कंटेनर चालकासह तिघांविरोधात सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या कंटेनर चालकासह क्लीनरचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी कंटेनरचालक रुस्तम ऋदार खान (वय ३५, रा. किरवारी, किसनगड, जि. खेरतल, राजस्थान), क्लीनर मुस्ताक हनीफ खान (वय ३१, रा. मनापुरी, रासगड, जि. अलवर, राजस्थान) आणि ताहीर नासीर खान (वय ४५, राजस्थान) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात कंटेनरचालक रुस्तम आणि क्लीनर मुस्ताक यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातात ताहीर खान गंभीर होरपळला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.