शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत ‘नाशिक पॅटर्न’

By admin | Updated: March 7, 2015 00:16 IST

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना ‘नाशिक पॅटर्न’च्या धर्तीवर मनसेच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने त्या विजयी झाल्या.

पुणे : महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना ‘नाशिक पॅटर्न’च्या धर्तीवर मनसेच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने त्या विजयी झाल्या. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेचा नवीन पॅटर्न उदयास आला असून, त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन करताना काँग्रेसला एक वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचे ठरले होते. परंतु, चौथ्या वर्षाचे अध्यक्षपद देण्याचा आग्रह काँग्रेसने धरला होता. त्यानुसार काँग्रेसने स्थायी समितीसाठी माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुतणे चंद्रकांत कदम यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीनेही अश्विनी कदम यांना रिंंगणात उतरविले. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने नाशिक महापालिकेच्या धर्तीवर मनसेचा पाठिंबा घेण्याची तयारी केली. राष्ट्रवादीची ही चाल लक्षात आल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी गुरुवारी काँग्रेसची ऐनवेळी धावपळ झाली. राष्ट्रवादी व मनसे एकत्र आल्यास संख्याबळानुसार अश्विनी कदम यांचा विजय निश्चित होता. त्यामुळे निवडणुकीतील माघारीसाठी असलेल्या १५ मिनिटे मुदतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी स्थानिक नेत्यांनी चर्चा करून चंद्रकांत कदम यांना माघार घेण्यास भाग पाडले. अन् काँग्रेसनेही ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादीमागे झालेली फरफट चर्चेचा विषय बनली आहे.‘डीपी’ मंजुरीवर पडसाद...पुण्याचा प्रारूप विकास आराखडा मुख्यसभेपुढे आला आहे. त्यामध्ये आरक्षणावरून अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामध्ये महापालिकेत नाशिकच्या धर्तीवर राष्ट्रवादी व मनसेचा नवा पॅटर्न तयार झाला. आता बदललेल्या राजकीय समीकरणाचे पडसाद प्रारूप विकास आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेवर पडण्याची शक्यता आहे.