शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Narendra Modi in Pune: नरेंद्र मोदी ठरले पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी, मोबाईलवरुन काढलं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 12:53 IST

पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर नरेंद्र मोदींनी गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास केला.

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. मोदी तब्बल पाच तास आज पुण्यात असणार आहेत. या दरम्यान त्यांनी पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रोचे उदघाटन, पीएमपीएलच्या 100 ई-बस आणि ई-बस डेपोचं लोकार्पण केलं. दरम्यान, मोदी हे पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी ठरले आहेत.

नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. यानंतर मोदींनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास केला. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. 

मोदींनी दिव्यांगांशी साधला संवादया मेट्रोच्या प्रवासात पंतप्रधान मोदींनी काही दिव्यांग शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणतत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार