उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाची मासिक उलाढाल १०० कोटींची; पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:49 PM2021-09-02T20:49:20+5:302021-09-02T20:49:48+5:30

पुणे : नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा केदार उर्फ गणेश गायकवाड यांच्यावर पुणे व पिंपरी पोलिसांनी मकोका कायद्यानुसार कारवाई ...

Nanasaheb Gaikwad and his family have a monthly turnover of Rs 100 crore | उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाची मासिक उलाढाल १०० कोटींची; पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर  

उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाची मासिक उलाढाल १०० कोटींची; पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर  

googlenewsNext

पुणे : नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा केदार उर्फ गणेश गायकवाड यांच्यावर पुणे व पिंपरी पोलिसांनी मकोका कायद्यानुसार कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याच कुटुंबातील दीपा गायकवाड उर्फ पवार हिला अटक झाल्यामुळे आता गायकवाड सदस्यांमधील आरोपींची संख्या नऊवर गेली आहे. गायकवाडसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व वैध -अवैध पद्धतीने करण्यात आलेली मासिक उलढाल ही १०० कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबियांच्या घराची पोलिसांनी नुकतीच झडती घेतली. त्यात पोलिसांना काही मुद्देमाल सापडला आहे. मात्र अद्याप काही कागदपत्रे, लोकांकडून जबरदस्तीने लिहून घेतलेले दस्तावेज, बेहिशोबी मालमत्ता, रोख रकमा या आरोपींनी नियोजनबद्धरित्या कट रचून अनोळखी ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत. हे सर्व दस्ताऐवज लपविण्यामध्ये दिपा गायकवाड हिचा मुख्य सहभाग असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली असून, तिला पोलीस कोठडी मिळाली आहे.

यापूर्वी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७० ), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उद्या (दि.३) त्याची मुदत संपत आहे.

गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून, उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर इलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाइल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची एक मशिन मिळून आल्याचे सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मूळ फिर्यादीतर्फे पुष्कर दुर्गे, सचिन झालटे, ऋषिकेश धुमाळ कामकाज पाहत आहे. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
 

Web Title: Nanasaheb Gaikwad and his family have a monthly turnover of Rs 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.