Pune | नाना पटोलेंनी घेतली गिरीश बापटांची भेट; पटोलेंनी सांगितले भेटीचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 21:30 IST2023-02-06T21:26:16+5:302023-02-06T21:30:02+5:30

नाना पटोले यांनी खासदार गिरीश बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली...

Nana Patole received Girish Bapat's gift discussion in political circles pune latest news | Pune | नाना पटोलेंनी घेतली गिरीश बापटांची भेट; पटोलेंनी सांगितले भेटीचे कारण

Pune | नाना पटोलेंनी घेतली गिरीश बापटांची भेट; पटोलेंनी सांगितले भेटीचे कारण

पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापले असतानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार गिरीश बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्याची जागा रिक्त झाली. भाजपने टिळक कुटुंबातील उमेदवार न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रिंगणात उतरले आहेत. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी आले होते. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी आज दुपारी खासदार गिरीश बापट यांची रुग्णालयात भेट घेतली. ही भेट सदिच्छा असून राजकीय नव्हती, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी भेटीनंतर दिली.

Web Title: Nana Patole received Girish Bapat's gift discussion in political circles pune latest news