शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या तलावाला ठेकेदाराचे नाव

By admin | Updated: May 25, 2015 05:56 IST

महापालिकेचे जलतरण चालविण्यास दिलेल्या ठेकेदारांकडून नागरिकांकडून अवाजवी शुल्क उकळले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या जलतरण तलावाच्या

पुणे : महापालिकेचे जलतरण चालविण्यास दिलेल्या ठेकेदारांकडून नागरिकांकडून अवाजवी शुल्क उकळले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या जलतरण तलावाच्या नावाचा बोर्ड काढून तो स्वत:च्या मालकीचा असल्याप्रमाणे स्वत:चा बोर्ड लावण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील ना. ग. नांदे जलतरण तलावाचे नाव परस्पर बदलून त्याठिकाणी ठेकेदाराने स्वत:चा बोर्ड लावला आहे.नागरिकांना जलतरण तलावाची सुविधा किफायतशीर दरामध्ये उपलब्ध व्हावी, म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरामध्ये २१ जलतरण तलावांची उभारणी केली आहे. पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने खाजगी ठेकेदारांना ते चालविण्यासाठी दिले जातात. त्याचवेळी नागरिकांकडून किती शुल्क आकारायचे ते महापालिकेच्या मुख्य सभेने निश्चित करून दिले आहे. महिना ३५० रुपये किंवा प्रति तास २० रुपये शुल्क पोहण्यासाठी येणाऱ्यांकडून घ्यावेत, असा दर शहरातील सर्व जलतरण तलावांसाठी ठरविण्यात आला आहे. ठेकेदारांकडून त्यापेक्षा जास्त शुल्क उकळले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.जादा शुल्क उकळण्याबरोबरच पालिका तलाव असल्याची ओळखच पुसून प्रकार केले जात आहेत. बालगंधर्व येथील जलतरण तलावाला ना. ग. नांदे यांचे नाव सन्मानाने देण्यात आले. मात्र, ठेकेदाराला केवळ त्याचे व्यवस्थापन पाहण्यासाठी तलाव ताब्यात दिले असता त्याने पालिकेचा बोर्ड काढून स्वत:चा ‘द चॅम्पियन अ‍ॅक्टीव क्लब’ असा बोर्ड लावला आहे. त्यामुळे तलावामध्ये पोहण्यासाठी येणाऱ्यांना हा महापालिकेचा तलाव असल्याची माहिती पडत नाही. खाजगी क्लबचा तलाव असल्याचे त्यामुळे भासविले जात आहे. खाजगी क्लबचा जलतरण तलाव असल्याची लोकांची समजूत झाल्याने लोक खाजगी दराने शुल्क भरतात. प्रति तास १०० रुपये तर प्रति महिना प्रशिक्षणासह दीड हजार रूपये इतके अवाजवी शुल्क याठिकाणी आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)