शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

Pune Police: पोलीस कोठडीतील मृत्यूचे गूढ आता CID कडे; लॉकअपमध्ये मृत्यू, आत्महत्या की खून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 12:18 IST

बॅरिगेटचे आतील सर्व दरवाजे उघडे होते. कैदी कधीही बाहेर येऊ शकतात...

-तानाजी करचे

पुणे : विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या सेंट्रल लॉकअपमध्ये २४ वर्षीय युवकाचा झालेला मृत्यू संशयाच्या भाेवऱ्यात अडकलेला आहे. या घटनेची सत्यता तपासण्याच्या दृष्टीने ‘लाेकमत’ने प्रत्यक्ष पाहणी केली असता जानकार आणि नातेवाइकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांत तथ्य वाटावे, अशी स्थिती आहे. एकूण परिस्थिती पाहता सध्या तरी पाेलिस लॉकअपमधील युवकाचा मृत्यू आत्महत्या आहे की खून? हा प्रश्न गंभीर आहे. याची दखल घेऊन स्वत: पाेलिस आयुक्तच पुढे येत ‘हा सूर्य आणि हा जयध्रृत’ असे घटनेमागचे सत्य लाेकांसमाेर मांडणार का? हा खरा प्रश्न आहे.

बॅरिगेटचे आतील सर्व दरवाजे उघडे होते. कैदी कधीही बाहेर येऊ शकतात, कोणत्याही बॅरिगेटमध्ये जाऊ शकतात. ज्या आरोपीने शिवाजी गरड याचे नाव घेतले होते तो आरोपीही तेथे असणे, त्यांच्यात भांडणे होऊ शकतात, त्यात एखाद्या आरोपींचा जीवही जाऊ शकतो, या शक्यता असतानाही सुरक्षिततेकडे इतके अक्षम्य दुर्लक्ष हाेते कसे? कदाचित शिवाजी गरड प्रकारात असा प्रकार तर झाला नाही ना? असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.

विश्रामबाग पाेलिस लॉकअपच्या ठिकाणचे चित्र पाहता जे शक्य नाही ते केले, असे दाखवणे, सुरक्षिततेकडे हायगय करणे, यावरून खरंच शिवाजी गरड यांनी आत्महत्या केली आहे की आत्महत्येस प्रवृत्त केले? की त्यांचा खून झाला?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व गुन्ह्याचा तपास सध्या सीआयडीकडे सुरू आहे. त्यातून सर्व पुढे येईलच, अशी अपेक्षा आहे.

का उपस्थित हाेतात प्रश्न?

१) ज्या भिंतीच्या खिडकीला आरोपीने आत्महत्या केली, त्या खिडकीला पोलिसांनी त्वरित जाड पत्र्याची वेल्डिंग मारून ती खिडकी त्वरित बंद का केली?

२) संबंधित गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे, मग आत्महत्या केलेली जागा सील करून ठेवण्याऐवजी तेथील पुरावे नष्ट करण्यासाठी तर विश्रामबाग ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी हा प्रताप केला नसेल का?

३) शिवाजी गरड या २४ वर्षीय युवकाचा मृत्यू होतो. मृत्यू होण्याअगोदर दोन दिवस आधी म्हणजे १५ मेच्या रात्री सव्वादहा वाजता गुन्ह्यामध्ये तपास करणारे अधिकारी गरड याला घेऊन खासगी वाहनाने का जातात? आणि १७ मे रोजी रात्री दोन वाजता आणून पुन्हा सेंटर लॉकअपमध्ये ठेवतात. दाेन दिवस नेमके काय घडले?

४) गरड याच्यावर लावलेल्या गुन्ह्यातीलच आरोपी अजय शेंडे, सचिन कदम आणि गरड हे एकाच लॉकअपमध्ये कसे? त्याच रात्री वरील दाेन आराेपींना येरवडा कारागृहातून पाेलिस लाॅकअपमध्ये का आणले आणि साेबत का ठेवले गेले?

५) विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या सेंट्रल लॉकअपला पुरुष सेलमध्ये चार बॅरिगेट असून, त्या रात्री चारही बॅरिगेटचे दरवाजे उघडे कसे होते? याबाबत स्वत: पाेलिस निरीक्षकांनीच यावर बॅरिगेट कायम उघडे असतात, असे उत्तर दिल्याने आश्चर्य आणि प्रश्नही उपस्थित हाेताे.

६) शिवाजी गरड यांची उंची आणि ते ज्या भिंतीवर लटकले आहेत त्या भिंतीची उंची. त्या जाळीच्या आतमध्ये हात घालून ओवून घेतलेला दोर जो की त्या जाळीमधून तो ज्या पद्धतीने ओवून घेतला आहे तो तसा ओवून घेणे शक्य नाही. मग हे शक्य कसे झाले, याचे उत्तर काय?

७) शिवाजी गरड हा तरुण हातात दोरीसारखे काही तरी घेऊन शाैचालयाकडे जाताना दिसत होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक स्वत:च देतात, तरीही हा प्रकार थांबवला कसा नाही? तिथे दोन अधिकारी उपस्थित होते; मग शिवाजी गरड हातात दोरीसारखे दिसणारे काही तरी घेऊन जात आहेत हे दिसूनही अधिकाऱ्यांनी त्याला का अडवले नाही?

८) आरोपीचा खून झाला की खरंच आत्महत्या केली? याचा तपास सीआयडी करेलच; परंतु ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा सर्व प्रकार घडला, त्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्त काय कारवाई करणार? की त्याकडे डोळे झाक करणार?

‘त्या’ दोन दिवसांत काय घडले?

- पीएसआय सुरेश जायभाय यांनी आरोपीला रात्री सव्वादहा वाजता कोठडीतून बाहेर काढले आणि प्रायव्हेट गाडीतून तपासासाठी घेऊन गेले. आरोपीकडून तपासच करायचा होता, तर आरोपीला दिवसा घेऊन का गेले नाहीत, आरोपीला रात्री घेऊन जाऊन दोन दिवस आरोपी जायभाय यांच्या ताब्यात होता. जायभाय यांनी दोन दिवसांत आरोपीला असा कोणता त्रास दिला की आरोपीला आत्महत्या करावी लागली?

हे कसे शक्य आहे?

- ज्या भिंतीवरती आरोपी लटकलेला आहे त्या भिंतीची उंची १६ फुटांच्या वर आहे. आरोपीची उंची पाच फुटांच्या आसपास आहे. मग आरोपी स्वतःच्या उंचीपेक्षा जास्त उंची असणाऱ्या भिंतीवर चढतो कसा? व तिथून वर असणाऱ्या जाळीच्या खिडकीच्या आतमधून दोर ओढून घेतो कसा? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे.

- आरोपीने फासावर ज्या बाजूने लटकला होता तसा ताे लटकू शकत नाही. तसा ताे लटकला असता तर डाेक्याच्या मागील बाजूस मार लागला असता; पण पाेस्टमार्टम रिपाेर्टमध्ये तसे दिसत नाही. त्यामुळे आरोपी स्वतःहून लटकला आहे की कोणी लटकवला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आराेपी गरड याला तपासकामी गावी घेऊन गेल्यानंतर ‘पोलिस अधिकाऱ्यांनी मला प्रचंड मारहाण केली’, असे ताे आपल्या नातेवाइकांना मोठमोठ्याने ओरडून सांगत होता. त्यावर तपासी अधिकारी सुरेश जयभाय यांनी पुन्हा नातेवाइकांसमोरच मारहाण केली? यावरून सदर प्रकरणात खूप गडबडी वाटतात.

- भास्कर गरड, सरपंच

लॉकअपमधील बॅरिगेटचे दरवाजे उघडेच होते; परंतु पोलिस कस्टडीत झालेल्या आत्महत्येचा तपास सीआयडी करत आहे.

- संदीप सिंग गिल्ल, पोलिस उपायुक्त.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे