शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुण्यात झालेल्या मायलेकराच्या खून प्रकरणाचे गुढ अजूनही कायम; पतीचा पत्ता लागेना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:18 PM

पत्नी आणि मुलाचा खून करून मृतदेह कात्रज घाटात फेकून दिला असा पोलिसांचा संशय

ठळक मुद्देपत्नी, मुलाच्या दुहेरी खून प्रकरण, दोन खुनानंतरही पती अबिद शेख याचा अद्याप काहीही तपास लागू शकला नाही

पुणे: सासवडजवळ पत्नीचा खून करुन मृतदेह टाकून दिल्यानंतर कात्रज घाटात मुलाचा गळा दाबून खुन करुन मृतदेह फेकून दिला. त्यानंतर सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार सोडून दिलेली आढळून आली. दोन खुनानंतरही पती अबिद शेख याचा अद्याप काहीही तपास लागू शकला नाही. पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्या तपास लागल्यावरच या मागील नेमके गुढ उलघडण्याची शक्यता आहे.

 प्राथमिक अंदाजानुसार ग्रामीण पोलीस व शहर पोलिसांचा पती अबिद शेखवर संशय आहे.आलिया शेख (वय ३५) आणि आयन शेख (वय ६) असे खुन झालेल्या दोघांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आबिद शेख हे मुळचे मध्य प्रदेशातील विदिशा येथील राहणारे आहेत. काही वर्षांपूर्वी ते पुण्यातील धानोरी, विमाननगर भागात रहात आहेत. अबिद शेख हा एका विमा कंपनीत मॅनेजर आहे. ११ जूनला हे तिघे जण भाड्याने कार घेऊन पिकनिकला गेले होते. त्यानंतर अबिद शेख याने भाड्याने घेतलेल्या कारचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवला. सोमवारी रात्री ९ वाजता अबिद शेख याने आपल्या विदिशा येथील नातेवाईकांना फोन करुन आम्ही अर्धा तासात घरी पोहचत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विदिशातील नातेवाईकांनी ही बाब पुण्यात राहणार्‍या त्यांच्या चुलत भावाला सांगितली. ते शेख यांच्या घरी गेले तर तेथे घराला कुलूप आढळले. 

अबिद शेख खून करून पळून गेला; पोलिसांचा संशय 

अबिद शेख यांना भाड्याने कार देणार्‍या कंपनीचे अधिकारीही तेथे आले होते. त्यांचाही शेख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी त्यांनी कारवरील जीपीएस यंत्रणेद्वारे तिचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती कार सातारा रोडवरील एका चित्रपटगृहाबाहेर विरुद्ध दिशेला ही कार पार्क केल्याचे आढळून आले. सहकारनगर पोलिसांनी या कारची पाहणी केल्यावर त्यात काही रक्ताचे डाग दिसून आले. दरम्यान, सासवडजवळील खळद येथे एका महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. त्याचवेळी सायंकाळी कात्रज बोगद्याजवळ मुलाचा मृतदेह आढळून आला. हे दोघेही आई व मुलाचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याचवेळी अबिद शेख यांचे काय झाले, याचा तपास लागू शकला नाही.

अबिद शेख याने पत्नी व मुलाचा खून केला. त्यानंतर सासवड जवळ पत्नीचा मृतदेह टाकून दिला. तेथून तो कारने कात्रज घाटात आला. तेथे मुलाचा मृतदेह टाकला. त्यानंतर तो सातारा रोडवर आला. तेथे गाडी पार्क करुन तो कोठेतरी पळून गेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. अबिद शेख यानेच दोघांचा खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलीस शहरातील सीसीटीव्हींचे फुटेजची तपासणी करीत आहेत. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, महिलेची ओळख पटली असून तिचा पती अद्यापही बेपत्ता आहे. त्यानेच हे दोन्ही खुन करुन तो पसार झाला असावा, असा संशय आहे. तो सापडल्यानंतर यावर अधिक खुलासा होऊ शकेल.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक