मुठेचा श्वास कोंडला.!

By Admin | Updated: November 9, 2014 01:05 IST2014-11-09T01:05:42+5:302014-11-09T01:05:42+5:30

सर्वात जास्त लोकसंख्या व त्याच प्रमाणात अनधिकृत बांधकामे असलेले शिवणो गावातही बाकीच्या गावाप्रमाणोच सामाईक बांधकाम समस्या आहे.

Mutha breathed breath! | मुठेचा श्वास कोंडला.!

मुठेचा श्वास कोंडला.!

सचिन सिंग- वारजे
सर्वात जास्त लोकसंख्या व त्याच प्रमाणात अनधिकृत बांधकामे असलेले शिवणो गावातही बाकीच्या गावाप्रमाणोच सामाईक बांधकाम समस्या आहे. गावात बेकायदा बांधकामाबरोबरच नदीच्या पूररेषेच्या आतमध्ये व पूररेषेला लागूनही बांधकामे झाली आहेत. त्यामुळे भविष्यात नदीच्या प्रवाहालाही धोका होऊ शकतो. 
शिवणो गाव म्हटलं, की पुणो मनपाच्या हद्दीलगत एनडीए रस्त्याला लागणारे हे पहिलेच गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणो म्हणजे पुण्यातच राहिल्याचा आभास येतो. अशा प्रकारच्या जाहिराती या भागातील बांधकाम व्यावसायिक करीत असतात. त्यातल्या त्यात या ठिकाणी सदानिकांमधून नदीचे विहंगम दृश्य दाखविण्याच्या प्रय}ात बांधकाम व्यावसायिक पार नदीच्या पूररेषेपर्यंत बांधकाम करीत आहेत. काही व्यावसायिक तर पूररेषेच्या व ठरवून दिलेल्या जागेच्या बाहेर जाऊन बांधकामे करीत आहेत. 
ही समस्या काही एकटय़ा शिवणो गावाचीच नसून, अशा प्रकारची बांधकामे खडकवासला धरणापासूनच सुरू होत आहेत व शिवण्यापर्यंत येऊन पुढे पुणो मनपाच्या हद्दीतही अतिक्रमित बांधकामे आहेतच. 
गावात बेकायदा बांधकामाचा तर सुळसुळाट आहे. दोन ते तीन मजली बांधकामाची परवानगी असताना पैशाच्या हव्यासापायी व्यावसायिकांनी पाच व सहा मजली बांधकामे केली आहेत. या ठिकाणी ग्राहकांना फ्लॅटची विक्री करताना नगर नियोजन विभागाचा बांधकाम सुरू करतानाचा परवाना दाखविला जातो.  याबाबत व्यावसायिक नागरिकाना संभ्रमित करण्यात चांगलेच पटाईत आहेत. खालच्या सदनिका बुक झाले आहेत, असे सांगून प्रथम वरच्याच सदनिका ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. त्यानंतर खालच्या मजल्याच्या सदानिकांना अतिरिक्त भाव लावून मलिदा कमविला जातो. काही इमारतींना तर साइड मार्र्जीन ठेवलीच जात नाही, तसेच अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाच्या वाहनांना आप्तकालीन  परिस्थितीत पोहोचणो अवघड होऊन बसते.   
या परिसरातील सर्व बेकायदा बांधकामांना राजकीय पक्षांचे मोठय़ा प्रमाणात पाठबळ असते. बहुतेक व्यावसायिकांचे राजकारण्यांशी व्यावसायिक संबंध असतात. काही प्रकरणात तर जमीनमालकच बांधकाम व्यावसायिक झाल्याची उदाहरणोदेखील आहेत.  तसेच ग्रामपंचायतीचे या सर्वांवर कसलेही नियंत्नण नाही. ग्रामपंचायत फार फार तर नोटीस देऊ शकते. त्यांना कारवाईचे कसलेही अधिकार किंवा कसलीही यंत्नणा नसल्याने बांधकामे फोफावत जातात.
याबाबत बांधकामावर बंधने येण्यासाठी सक्षम यंत्नणा उभी करणो व या गावांचे मनपात होणारे विलीनीकरण लवकरात लवकर व्हावे,अशी नागरिकांची मागणी आहे. 
 
वारजे, बावधनसारख्या मनपा हद्दीत सदनिका सुमारे 4क् ते 45 लाखांना घेण्यापेक्षा येथून सुमारे दोनच किलोमीटर पुढे शिवण्यात 3क् लाखांना उपलब्ध होत असल्याने सामान्य ग्राहकांना तोच पर्याय योग्य वाटतो. आपली फसवणूक झाल्याचे व इमारतीचे वरचे मजले बेकायदा आहेत हे ग्राहकांना उशिरा समजून काही उपयोग नाही. काही ग्राहक माहीत असूनही आजर्पयत कुठलीच कारवाई झाली नाही व यापुढेही होणार नाही, या अविर्भावात असून, ते बिनदिक्कत सदनिका खरेदी करीत आहेत.
 
नदीपात्रत ब्लू लाइन व रेड लाइन सोडूनच बांधकामे झाली आहेत. इतर गावांप्रमाणो शिवण्यातही अनधिकृत बांधकामे आहेत. तरीही नागरिकांना शक्य तितक्या सोयी-सुविधा देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. अनधिकृत बांधकामांमुळे सुविधा पुरविण्यावर ताण येत आहे.
- कुसुम दांगट, सरपंच, शिवणो

 

Web Title: Mutha breathed breath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.